शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

ट्विटर चिमणीबाबत मोठी बातमी आली; लिलावात मिळाली एवढी किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 19:06 IST

सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रचलित असलेले ट्विट, ट्विटर आणि त्याची चिमणी या तिन्ही गोष्टी अब्जाधीश एलन मस्क यांनी हद्दपार केल्या आहेत. मस्कनी ट्विटर विकत घेत त्याचे आधी नामांतर केले, नंतर लोगो बदलला आता हे ट्विटर मुळात ट्विटर राहिले नाही, तसेच कोणी काही अपलोड केले की त्याला ट्विट केले असे म्हटले जात होते, त्याला आता पोस्ट म्हटले जात आहे. ट्विटरला आता एक्स असे म्हटले जात आहे. अशातच चिमणीबाबत मोठी बातमी आली आहे. 

सोशल मीडियात क्रांतीकारी ठरलेल्या ट्विटरच्या ब्लू बर्डला नवा मालक मिळाला आहे. हा निळ्या पक्षाचा लोगो जो इतिहास बनला होता त्याचा लिलाव झाला आहे. एका व्यक्तीने हा लोगो 34,375 अमेरिकी डॉलर (28.5 लाख रुपये) ना विकत घेतला आहे. मस्कनी  'X' असे रिब्रँड करत हा लोगो हटविला होता. एवढेच नाही तर ट्विटरच्या मुख्यालयावरूनही ही चिमणी काढून टाकण्यात आली होती. 

"दुर्मिळ आणि संग्रहणीय वस्तू" लिलाव करणाऱ्या आरआर ऑक्शन कंपनीने याचा लिलाव केला आहे. २५४ किलो वजनाचा आणि १२ फूट बाय ९ फूट लांबीचा हा बोर्ड ३४,३७५ अमेरिकन डॉलर्सना विकला गेला आहे. या खरेदीदाराचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मस्कनी आधीच्या ट्विटर मुख्यालयातील इतर अनेक गोष्टींचा लिलाव केला होता, ज्यामध्ये साइन बोर्ड, स्मृतिचिन्हे, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि अगदी ऑफिस फर्निचरचाही समावेश होता. आता या लोगोचाही लिलाव झाला आहे. 

याचबरोबर सीलबंद असलेल्या पहिल्या पिढीतील ४ जीबी आयफोनचाही लिलाव करण्यात आला आहे. याची किंमत ८७,५१४ अमेरिकन डॉलर्स एवढी लावण्यात आली आहे. Apple I संगणक (सर्व अॅक्सेसरीजसह) 375,000 डॉलरमध्ये विकला गेला. १९७६ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांनी स्वाक्षरी केलेला अ‍ॅपल संगणक कंपनीचा चेक १,१२,०५४ अमेरिकन डॉलर्सला विकला गेला. 

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क