वनप्लसपेक्षा स्वस्तात मिळतोय iPhone 12; किंमत पाहून होईल बुक करण्याचा मोह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 16:04 IST2022-06-08T16:04:38+5:302022-06-08T16:04:51+5:30
Amazon Monsoon Carnival सेलमध्ये iPhone 12 वर आजवरचा सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे.

वनप्लसपेक्षा स्वस्तात मिळतोय iPhone 12; किंमत पाहून होईल बुक करण्याचा मोह
Amazon Monsoon Carnival सेल 12 जून 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. मग यातून आयफोन तरी कसे दूर राहतील. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर iPhone 12 वरचा सर्वात मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
iPhone 12 वरील ऑफर
iPhone 12 चा 64GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 65,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अॅमेझॉनवर याची विक्री 54,900 रुपयांमध्ये केली जात आहे. तसेच जर तुमच्याकडे Citibank चं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या फोनची किंमत 53,400 रुपये होईल.
iPhone 12 वर 9,550 रुपयांचा एक्सचेंज ऑफर देखील आहे. म्हणजे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 9,550 रुपयांची बचत करू शकता. योग्य असा जुना स्मार्टफोन दिल्यास तुम्ही नवाकोरा iPhone 12 फक्त 43,850 रुपयांमध्ये तुमचा होईल.
iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो