शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

WhatsApp, Signal, Telegram सारख्या १५ अ‍ॅप्सवरील मेसेजेसना एकाच अ‍ॅपवरून करा रिप्लाय

By जयदीप दाभोळकर | Published: January 23, 2021 1:27 PM

आलं ऑल इन वन अ‍ॅप, मेसेजिंग अ‍ॅप्सना एकाच ठिकाणी मॅनेज करता येणार

ठळक मुद्दे'बीपर' असं या नव्या अ‍ॅपचं नाव आहेएकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार सर्व अ‍ॅप्स वापरण्याची संधी

प्रत्येक जण सध्या किंमान दोन तीन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर तरी करतच असेल. यात प्रत्येक मेसेजिंग अ‍ॅप्सवरचे मेसेज जाऊन प्रत्येक वेळी वाचणं शक्यही होत नाही. परंतु आता यासाठी एक भन्नाट अ‍ॅप आलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी अ‍ॅप्स ओपन करून त्यात जाऊन मेसेजेस वाचण्याची गरजच पडणार नाही. या अ‍ॅप्सच्या मदतीनं तुम्हाला १५ पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहेत. 'बीपर' असं या नव्या अ‍ॅपचं नाव आहे. याच्या माध्यमातून अनेक अ‍ॅपमधील मसेजे या एकाच अ‍ॅपमध्ये पाहता येतील. या अ‍ॅपच्या मदतीनं युझरला १५ मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. हे अ‍ॅप सेंट्रल हब प्रमाणे काम करतं. यामध्ये फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या अ‍ॅप्सचा लाभ घेता येईल.  याव्यतिरिक्त या अ‍ॅपची महत्त्वाची बाब म्हणजे बीपरमध्ये आयमेसेजचाही वापर करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त हे अ‍ॅप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करतं. यात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे हे अ‍ॅप युझर्सना मोफत मिळणार नाही. या अॅपचा वापर करण्यासाठी युझरला दर महिन्याला १० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५० रूपये द्यावे लागणार आहेत. याच्या माध्यमातून युझर्सना सर्वच अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येतील. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर. सिग्नल, स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट आहे. यापूर्वी हे अ‍ॅप NovaChat या नावानं ओळखलं जात होतं. Eric Migicovsky यांनी हे अ‍ॅप विकसित केलं आहे. 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानApple IncअॅपलAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोनTwitterट्विटरInstagramइन्स्टाग्रामSocial Mediaसोशल मीडिया