Apple iPhone 11 gets a discount of Rs 8400 on Amazon Prime Day sale | Apple iPhone 11 वर बंपर डिस्काऊंट; अ‍ॅमेझॉनवर मिळतेय घसघशीत ऑफर!

Apple iPhone 11 वर बंपर डिस्काऊंट; अ‍ॅमेझॉनवर मिळतेय घसघशीत ऑफर!

आपल्याकडे अ‍ॅपलचा फोन असावा हे सर्वांचेच स्वप्न... पण, अ‍ॅपलच्या किमती पाहून तो सर्वांनाच परवडणारा नक्कीच नाही. मात्र, आता अ‍ॅपल घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तुम्ही Apple iPhone 11 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर यापेक्षा चांगली संधी तुम्हाला मिळणार नाही. Amazon Prime Day वर अ‍ॅपल iPhone 11 वर घसघशीत सूट मिळत आहे. 

हार्दिक-नताशाच्या मुलाचं नाव ठरलं; केकवरील 'त्या' नावानं केला खुलासा!

एप्रिल महिन्यात GST लागू झाल्यामुळे iPhone 11सह सर्व अ‍ॅपल फोनच्या किमती वाढल्या होत्या. iPhone 11 लाँच झाला तेव्हा त्याची किंमत 64,900 इतकी होती आणि आता 64 GBसाठी तुम्हाला 68,300 तर 128 GBसाठी 73,600 रुपये मोजावे लागत आहे. iPhone 11 च्या 256GB फोनची किंमत 84,100 इतकी आहे. पण, आता सेलमुळे तुम्हाला हा फोन 59,900 रुपयांत घेता येणार आहे.

एक-दोन हजाराची नव्हे तर तब्बल 8400 रुपयांची सूट तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे अ‍ॅपल iPhone 11 तुम्हाला 59,900 रुपयांत घेता येणार आहे. 6 - 7 ऑगस्टला Amazon Prime Day sale लाईव्ह होत आहे. दोन दिवसांच्या या सेलमध्ये तुम्हाला बऱ्याच वस्तुंवर सूट दिली जात आहे. पण, हा सेल केवळ प्राईम युजर्ससाठी आहे. 

iPhone 11वर प्रथमच एवढी मोठी सूट दिली जात आहे. अ‍ॅमेझॉन एक्स्चेंज ऑफरही देत आहे. त्यामुळे तुम्हाला जुना फोन देऊन iPhone 11 घ्यायचा असेल तर तुम्हाला 11 हजारापर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय नो-कॉस्ट EMI हा पर्यायही दिला आहे.  iPhone 11  हा अॅपल मालिकेतील सर्वात स्वस्त फोन आहे. 6.1 इंच LCD स्क्रीन, 1792x828 पिक्सेल असे त्याचे फिचर्स आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

एवढा पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातील कोणतंही शहर तुंबणारच; पालिका आयुक्तांचा दावा 

राम मंदिर भूमिपूजनावर हसीन जहाँनं केली पोस्ट; फॅन्सनी दिली जीवे मारण्याची धमकी

'हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूकडून 'जय श्री राम'चा जयघोष!

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

Fact Check : ब्रायन लाराचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह? वेस्ट इंडिजच्या दिग्गज खेळाडूनं सांगितलं सत्य

 

Web Title: Apple iPhone 11 gets a discount of Rs 8400 on Amazon Prime Day sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.