Video : Woman somersaults into pool, her wig makes a perfect landing on diving board  | Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

Video : सगळे तिला समजावत होते डाईव्ह नको मारू, पण तिनं ऐकलं नाही; पुढे काय झालं तुम्हीच बघा!

स्विमिंगपूलमध्ये पोहणे कुणाला आवडणार नाही? लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला स्विमिंगपूलमध्ये मज्जा करायला आवडते. पण, कधी कधी ही आवड जपताना जरा जपूनच वागायचे असते, याचे भान अनेकदा विसरलेलं पाहायला मिळतं आणि त्यानं मित्रांसमोर फज्जा उडतो. असाच एक गमतीशीर प्रसंग एका महिलेसाबत घडला. सगळे तिला समरसॉल्ट नको मारून असे समजावत होते, पण ती ऐकेल तर खरं... कुणाचही न ऐकता ती डायव्हिंग बोर्डवर गेली आणि त्यानंतर जे घडलं, ते पाहून तुम्ही लोटपोट व्हाल. 

10 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात एक महिला डायव्हिंग बोर्डवर गेली आणि तिनं डाईव्ह मारली. उडी घेतल्यानंतर त्या महिलेच्या डोक्यावरील विग डायव्हिंग बोर्डवरच राहिला आणि त्या महिलेला शर्मेनं पाण्यातच बसून रहावे लागले. हा सर्व प्रकार पाहून तिच्या मित्रांनाही हसू काही केल्या आवरत नव्हतं. हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करून त्यावर लिहिलं की, आम्ही तिला समजावत होतो, पण तिनं ऐकलंच नाही.

सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ आतापर्यंत 7.5 लाखहून अधिक वेळा पाहिला गेला, तर 10.52 लाख लाईक्स व 29 हजाराहून अधिक जणांनी तो रिट्विट केला आहे. 
 

पाहा व्हिडीओ.. वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Video : Woman somersaults into pool, her wig makes a perfect landing on diving board 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.