आता AI केवळ कोडिंग, फोटो अथवा संगित तयार करण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही, तर ते आपल्या शरिरातील पेशींपर्यंतही जाऊन पोहोचले आहे. नुकतेच, OpenAI ने सिलिकॉन व्हॅलीची स्टार्टअप कंपनी Retro Biosciences सोबत एक मोठे यश मिळवल्याचा दावा केला आहे. या भागिदारीच्या माध्यमाने GPT-4b Micro तयार करण्यात आला आहे. त्याला, प्रामुख्याने प्रोटीन सीक्वेंस, बायोलॉजिकल रिसर्च और थ्री-डी मॉलेक्यूलर स्ट्रक्चर्सवर प्रशिक्षण देण्यत आले आहे.
पेशींना पुन्हा तरुण बनवण्याचा प्रयत्न...GPT-4b मायक्रो हे सामान्य चॅटबॉट्स प्रमाणे तयार करण्यात आलेले नाही. याचा उद्देश, पुनरुत्पादक औषधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रथिनांची पुनर्रचना करणे होता. संशोधकांनी याचा वापर एक मोठा वैज्ञानिक प्रयोग म्हणून केला. याच प्रथिनामुळे वैज्ञानिकांना नोबेल पारितोषिक मिळाले आहे. कारण याच्या सहाय्याने वृद्ध पेशींचे रुपांतर पुन्हा स्टेम पेशींमध्ये करता येऊ शकते.
AI ने तयार केलेले नवे प्रोटीन -OpenAI ने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की GPT-4b Micro ने यामानाका फॅक्टर्सचे नवीन आणि अधिक प्रगत व्हेरिअंट्स डिझाइन केले आहे. हा प्रोटीन पुर्वीच्या तुलनेत खूप अधिक प्रभावी ठरला आहे. प्रयोगशाळेतील परीक्षणात आढळून आले आहे की, एआयने तयार केलेल्या प्रथिनांनी सामान्य प्रथिनांच्या तुलनेत स्टेम सेल मार्करची अभिव्यक्ती ५० पट वाढवली. याशिवाय, पेशींमध्ये असलेले डीएनएची हानीही वेगाने भरून काढली आहे.
वृद्ध पेशी पुन्हा सक्रीय झाल्या -या प्रयोगांचा सर्वात आश्चर्यकारक परिणाम म्हणजे, जेवहा वृद्ध पेशींना या प्रथिनांच्या संपर्कात आणण्यात आले, तेव्हा त्या पुन्हा तरूण झाल्या सारखे वागू लागल्या. अर्थात, एआयने पेशींना तरुण ठेऊ शकणाऱ्या प्रक्रियेला गतीमान केले आहे. हा शोध वय वाढण्याचा वेग कमी करण्याच्या आणि कदाचित भविष्यात तो उलट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जाऊ शकते.