शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

ऐकावं ते नवलच! मुलाच्या फोनवर ट्विटरचा लोगो 'X' पाहताच वडिलांनी केली धुलाई; पोलिसांची मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 21:47 IST

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत.

twitter new logo : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरचा ताबा इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मस्क यांनी अनेकदा वेगवेगळे नियम लागू करून ट्विटरला प्रसिद्धीच्या झोतात ठेवले. अशातच त्यांनी ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल करून सर्वांचे लक्ष वेधले. खरं तर ट्विटरने आपल्या लोगोवरून पक्षी हटवला असून 'एक्स' सिम्बॉल बसवला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ट्विटरने लोगो बदलल्याने नागपुरात एक अनोखी घटना घडली. वडिलांनी आपल्या १६ वर्षीय मुलाच्या फोनमध्ये ट्विटरचा 'एक्स' पाहताच त्याला मारहाण केली. हा पोर्नोग्राफिक पचाच 'X' आहे असे समजून वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केली. 

गोपनीयतेचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित बाप-लेकाचे नाव उघड केले नाही. माहितीनुसार, ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय मुलाच्या स्मार्टफोनमध्ये 'X' लोगो पाहिला अन् त्याला काहीही न विचारता मारहाण केली. हा एक्स पॉर्न साईट किंवा पचा असल्याचा समज संबंधित व्यक्तीचा होता. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर स्पष्ट झाले की, वादाच्या केंद्रस्थानी असलेला लोगो दुसरा कोणी नसून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्विटरचा नवीन लोगो आहे. ट्विटरच्या नवीन लोगोमुळे ४५ वर्षीय व्यक्तीचा गैरसमज झाला होता. मुलगा पॉर्न पाहत असल्याचा गैरसमज वडिलांचा झाला होता, त्यामुळे त्यांनी मुलाला जबर मारहाण केली. हा सर्व प्रकार शेजारच्यांनी पाहताच त्यांनी पोलिसांची मदत घेतली. 

ट्विटर मुख्यालयावर नवीन लोगोट्विटरमध्ये आणखी अनेक सेवा देण्याची योजना मस्क यांच्या डोक्यात आहे. ट्विटरमध्ये अनेक नवीन बदल होणार आहेत, ज्याबद्दल आधीच सूचित करण्यात आले आहे. मस्क यांनी X प्लॅटफॉर्मबाबत मोठी तयारी केली होती आणि आणखी अनेक सेवाही आणत आहेत. या वर्षी एप्रिलमध्येच ट्विटरने आपल्या पार्टनरसोबत अधिकृत डीलसाठी एक्स कॉर्पचे नाव वापरले होते. इलॉन मस्क यांची Space X नावाची कंपनी देखील आहे. 

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कnagpurनागपूर