Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:38 PM2019-05-24T16:38:43+5:302019-05-24T16:52:48+5:30

लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला गेला आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान ट्विटरवर निवडणुकीसंदर्भात नेत्यांसोबतचं जनतेने खूप ट्वीट केले आहेत.

3.96 million tweets from january on the lok sabha elections | Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट

Lok Sabha Election 2019 : काय सांगता? तब्बल 39.6 कोटी लोकांचा टिवटिवाट

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला गेला आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान ट्विटरवर निवडणुकीसंदर्भात नेत्यांसोबतचं जनतेने खूप ट्वीट केले आहेत.जानेवारी ते मे महिन्यादरम्यान निवडणुकीसंदर्भात तब्बल 39.6 कोटी ट्विट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर केला गेला आहे. जानेवारी ते मे महिन्यादरम्यान ट्विटरवरनिवडणुकीसंदर्भात नेत्यांसोबतचं जनतेने खूप ट्वीट केले आहेत.

जानेवारी ते मे महिन्यादरम्यान निवडणुकीसंदर्भात तब्बल 39.6 कोटी ट्विट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या अनेक पटीने अधिक आहे. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 1 जानेवारी ते 12 मे दरम्यान निवडणुकीसंदर्भात 5.6 कोटी ट्विट करण्यात आले होते. निकालाच्या दिवशी म्हणजे 23 मे रोजी सर्वाधिक ट्वीट करण्यात आले आहेत. 

23 मे रोजी मतमोजणीदरम्यान 32 लाख ट्वीट करण्यात आले असून यापैकी एक तृतीयांश ट्विट हे दुपारी तीन ते चारच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटनंतर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोदींनी 'सबका साथ +सबका विकास +सबका विश्वास =विजयी भारत' अशा आशयाचे एक ट्वीट केले होते. मोदींचे हे ट्वीट एक लाखाहून अधिक लोकांनी रीट्वीट केलं आहे तर 3.18 लाख लोकांनी ते लाईक केलं आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष, ट्विटर युजर्स आणि मीडियाकडून 1 जानेवारी ते 23 मे दरम्यान 39.6 कोटी ट्वीट करण्यात आल्याची माहिती ट्वीटरने दिली आहे. 

Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला होता. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला होता. तसेच सोशल मीडियाने निवडणूक आयोगाच्या जागरूकता कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये भारताच्या संसदेचा एक फोटो फीचर करण्यात आला होता. ट्विटरने लोकसभा निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी पुढे ठेवण्यासाठी एका खास इमोजीची (भावनात्मक संकेत चिन्ह) सुरुवात केली होती. निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे. मतदानासंदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्वीटरने म्हटले होते. 

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात.

 

Web Title: 3.96 million tweets from january on the lok sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.