खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:13 PM2019-02-05T15:13:50+5:302019-02-05T15:27:39+5:30

ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे.

tech micro blogging site twitter may add support for editing tweets | खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

ठळक मुद्देट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे.ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. 

ट्वीटरचे संचालक जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात. ट्वीटरवर आतापर्यंत असे फीचर का नव्हते असे विचारले असता  'ट्वीटरची निर्मिती SMS म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा ट्वीट केल्यानंतर ते ट्वीट जगभरात पोहोचते' असे डोर्से यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून ट्वीटरमध्ये एडीटचे पर्याय उपलब्ध करुन द्या, अशी मागणी अनेक युजर्सने केली होती.

Web Title: tech micro blogging site twitter may add support for editing tweets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.