Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 10:19 AM2019-03-27T10:19:20+5:302019-03-27T10:26:32+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे.

Lok Sabha Election 2019 twitter new emojis on lok sabha elections and welcomes election commission | Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

Lok Sabha Election 2019 : Twitter वर लोकसभा निवडणुकीसाठी खास इमोजी

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे.मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे.ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी ट्विटरने एक खास इमोजी आणला आहे. मतदारांना जागरूक करण्याच्या उद्देशाने ट्विटरने हा नवा इमोजी युजर्ससाठी आणला आहे. तसेच सोशल मीडियाने निवडणूक आयोगाच्या जागरूकता कार्यक्रमाचे स्वागत केले आहे. ट्विटरचा हा खास इमोजी 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये भारताच्या संसदेचा एक फोटो फीचर करण्यात आला आहे. 

ट्विटरने लोकसभा निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी पुढे ठेवण्यासाठी एका खास इमोजीची (भावनात्मक संकेत चिन्ह) सुरुवात केली आहे. निवडणुकीशी संबंधित असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे. मतदानासंदर्भात त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ट्वीटरने म्हटले आहे.

17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत.

खूशखबर! Twitter वर आता एडिट करता येणार ट्वीट; फायदेशीर ठरणार नवं फिचर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट पोस्ट केल्यानंतर त्यामध्ये चूक असल्यास अथवा अन्य काही कारणांमुळे ती पोस्ट एडिट करायची असल्यास एडिटचा पर्याय उपलब्ध असतो. मात्र Twitter वर ट्वीट एडिट करता येत नाही. ट्वीटर युजर्ससाठी एक खूशखबर आहे कारण फेसबुकप्रमाणेच आता लवकरच ट्वीट एडिट करता येणार आहे. एडिटसाठी Twitter एक नवीन फीचर लॉन्च करणार आहे. ट्वीटरच्या या फीचरद्वारे युजर्सना एडिट केलेले ट्वीट दिसणार आहे मात्र याआधी केलेले मूळ ट्वीटही दिसणार आहे. 

ट्वीटरचे संचालक जॅक डोर्से यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्वीट एडिट करण्यासाठी आणण्यात येणाऱ्या नव्या फीचरचा युजर्सला फायदा होणार आहे. युजर्सकडे ते ट्वीट डिलीट करण्यासाठी 5 ते 30 सेकंदाचा वेळ असणार आहे. त्याच विंडोमध्ये युजर्स ते एडिट करू शकतात. ट्वीटरवर आतापर्यंत असे फीचर का नव्हते असे विचारले असता  'ट्वीटरची निर्मिती SMS म्हणजेच मेसेजच्या प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. एकदा मेसेज पाठवल्यानंतर तो रद्द करता येत नाही. त्याचप्रमाणे एकदा ट्वीट केल्यानंतर ते ट्वीट जगभरात पोहोचते' असे डोर्से यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून ट्वीटरमध्ये एडीटचे पर्याय उपलब्ध करुन द्या, अशी मागणी अनेक युजर्सने केली होती.

Web Title: Lok Sabha Election 2019 twitter new emojis on lok sabha elections and welcomes election commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.