अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा  

By सिद्धेश जाधव | Published: July 30, 2021 05:52 PM2021-07-30T17:52:31+5:302021-07-30T17:57:32+5:30

Lava offers Free Extended Warranty: लावा कंपनीने Free Warranty Extend ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्कविना मोफत 100 दिवसांची वॉरंटी दिली जाणार आहे.  

Lava offer giving 100 days Warranty extend on Out of Warranty smartphone repairs  | अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा  

अरे वाह! वॉरंटी संपल्यावर देखील मोफत रिपेयरिंग; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली घोषणा  

googlenewsNext

LAVA Mobiles ही भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी आहे जी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. आता कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करणारी घोषणा केली आहे. लावा कंपनीने Free Warranty Extend ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना मोफत 100 दिवसांची वॉरंटी दिली जाणार आहे.  

Lava ने आपल्या ग्राहकांसाठी एक शानदार ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत लावा मोबाईल युजर्सना 100 दिवसांची एक्स्टेंडेड वॉरंटी मोफत दिली जात आहे. या ऑफर अंतगर्त एक वर्षाहून जुन्या वॉरंटी नसलेल्या लावा मोबाईल्सवर पुन्हा 100 दिवसांची अतिरिक्त वॉरंटी मिळेल. या 100 दिवसांमध्ये लावा मोबाईल युजर्स कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता मोफत आपला मोबाईल फोन दुरुस्त करवून घेऊ शकतात.  

Lava चा पहिला 5G SmartPhone 

मीडिया रिपोर्ट्समधून लावाच्या पहिल्या 5जी फोनची माहिती आली आहे. एका वेबसाइटने लावाचे प्रोडक्ट हेड तेजिंद्र सिंह यांची मुलखात प्रकाशित केली आहे. या मुलाखतीतून लावा मोबाईल्सचे नियोजन आणि रणनीती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कंपनी भारतात आपला पहिला 5जी फोन आणण्याची तयारी करत आहे, हा 5G Lava Mobile दिवाळीच्या निमित्ताने भारतात लाँच केला जाईल.   

लावा प्रोडक्ट हेड तेजिन्द्र सिंह यांनी सांगितले आहे कि, या Lava 5G SmartPhone स्पेसिफिकेशन्स लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स असतील. तसेच या फोनसाठी टेलीकॉम कंपन्यांशी भागेदारी करून बंडल ऑफर देखील दिली जाऊ शकते. या फोनची किंमत 17,000 ते 20,000 रुपयांच्या आसपास असेल.    

Web Title: Lava offer giving 100 days Warranty extend on Out of Warranty smartphone repairs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.