सोलापूर : जमावानं धारदार शस्त्रांनी केली तरुणाची निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 09:39 IST2018-07-08T09:39:08+5:302018-07-08T09:39:26+5:30

सोलापूर शहरातील शिंदे चौकात सतीश उर्फ आबा कांबळे (वय 32 वर्ष) या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

youth killed by mob in Solapur | सोलापूर : जमावानं धारदार शस्त्रांनी केली तरुणाची निर्घृण हत्या 

सोलापूर : जमावानं धारदार शस्त्रांनी केली तरुणाची निर्घृण हत्या 

सोलापूर : सोलापूर शहरातील शिंदे चौकात सतीश उर्फ आबा कांबळे (वय 32 वर्ष) या तरुणाची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आबा कांबळे हा पत्रा तालिमचे कार्यकर्ता होता. नव्या पेठेजवळील मोबाइल गल्लीमध्ये त्याचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान होते. रात्रीच्या सुमारास दुकान बंद करुन तो गाडीवर मित्रांसोबत घराच्या दिशेनं निघाला होता. 

शिंदे चौकात आल्यावर त्यांच्या पाठीमागून 15 ते 20 जणांचा जमाव आला. या जमावानं तीक्ष्ण हत्यारांनी सतीशवर हल्ला केला. यामध्ये सतीश गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला. यानंतरही सतीशच्या मान व चेहऱ्यावर सपासप वार करुन जमाव पसार झाला. या घटनेत सतीशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. रुग्णालय परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

Web Title: youth killed by mob in Solapur