ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून ईश्वरवठारमध्ये युवक ठार
By दिपक दुपारगुडे | Updated: January 14, 2024 18:26 IST2024-01-14T18:25:55+5:302024-01-14T18:26:15+5:30
ऊस वाहतूक करणा-या एका ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.

ऊसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून ईश्वरवठारमध्ये युवक ठार
सोलापूर: ऊस वाहतूक करणा-या एका ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून एका २१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमरजीत श्रीधर शिंगाडे (वय २१, रा, ईश्वरवठार, ता. पंढरपूर) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून रविवार, १४ जानेवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. ईश्वरवठार परिसरात सध्या ऊसतोड सुरू आहे. परिसरात नागटिळक यांच्या शेतात सध्या ऊस तोडणी सुरु आहे.
येथून ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून अमरजीत शिंगाडे हा गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. अमरजीत हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूची वार्ता गावात वा-यासारखी पसरली. ईश्वरवठार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे. एकुलता एक व शांत स्वाभावचा म्हणून त्याची ओळख होती.
या आपघाताची नोंद पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील प्राथमिक तपास पोलिस नाईक नितीन माळी हे करीत आहेत.