Solapur Crime: इन्स्टाग्राम अकाउंटवर संदेश लिहिलेले दोन फोटो शेअर करून २१ वर्षीय रील स्टार तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार शेळगी परिसरातील मित्र नगरात बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास उघडकीस आला. प्रज्वल बसवराज कैनुरे (रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे. 'आज हम है, कल हमारी याद होगी' असा मेसेज त्याने फोटोवर ठेवला आहे.
बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास प्रज्वल याने घरामध्ये गळफास घेतल्याचे त्याच्या घरामधील नातलगांना आढळून आले. भाऊ रोहित याने नातलगांच्या मदतीने त्याच्या गळ्याचा फास सोडवून खाली उतरवले. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी प्रज्वलला तपासून मृत घोषित केले.
सॉरी पब्लिक, माफ करा पोस्ट
प्रज्वल हा मार्केट यार्ड येथे काम करत होता. शिवाय तो सोशल मीडियावर स्वतःचे रील तयार करून पोस्ट करीत होता. तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. आत्महत्येपूर्वी प्रज्वलने मेसेज लिहिलेले दोन फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. पहिल्या फोटोमध्ये 'आज हम हे, कल हमारी यादे होगी, जब हम ना होगे तब हमारी बाते होगी.!!' तर दुसऱ्या फोटोमध्ये, सॉरी पब्लिक, माफ करा मित्रांनो, खूप मोठा निर्णय घेतला आहे मी.., माझ्या आईची, माझ्या भावाची काळजी घ्या, हीच माझी इच्छा आहे." अशी पोस्ट केली होती.
Web Summary : A 21-year-old reel star from Solapur committed suicide by hanging after posting a message on Instagram. He apologized to the public and asked his family to be cared for.
Web Summary : सोलापुर के 21 वर्षीय रील स्टार ने इंस्टाग्राम पर संदेश पोस्ट करने के बाद फांसी लगाकर आत्महत्या कर ली। उसने जनता से माफी मांगी और अपने परिवार की देखभाल करने को कहा।