शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

कॅन्सरच्या विरोधात व्यापक लढा हवा : शिरीष कुमठेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:54 IST

तंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजेच एकूण कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी २२ टक्के इतका ...

ठळक मुद्देतंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडताततंबाखूच्या सेवनाने तोंड, घसा, जीभ, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्वादूपिंड, फुफ्फुसे, जठर, मूत्राशय, गर्भाशय इ. कॅन्सर उद्भवतात हे आता सिद्ध झाले

तंबाखूचे विविध प्रकाराने सेवन केल्यामुळे साधारणपणे ५० लाख लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. म्हणजेच एकूण कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी २२ टक्के इतका तो मोठा आकडा आहे. याचाच अर्थ असा की, जर आपण तंबाखूच्या वापरावर विविध मार्ग वापरून बंधने आणू शकलो तर मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे ओझे कमी करू शकू. तंबाखूच्या सेवनाने तोंड, घसा, जीभ, स्वरयंत्र, अन्ननलिका, स्वादूपिंड, फुफ्फुसे, जठर, मूत्राशय, गर्भाशय इ. कॅन्सर उद्भवतात हे आता सिद्ध झाले आहे.

अलीकडच्या काळात जगभरात दारू पिण्याच्या व्यसनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. प्रौढ लोकांपासून ते तरुण अल्पवयीन मुले-मुली मद्यपान करताना दिसतात. दारूच्या सेवनाने तोंड, घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका, जठर, लिव्हर, स्वादूपिंड व स्तन या आठ अवयवांचे कॅन्सर होतात. या व्यसनाविरुद्ध देखील आपण मोठ्या प्रमाणात जनजागृती करून हे कॅन्सर होणे टाळू शकतो.

आपल्या देशासकट अनेक पाश्चात्य देशात, वाढते वजन व लठ्ठपणाची देखील जणूकाही लाट आली आहे, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी, वाढती सुबत्ता हे या मागचे मुख्य कारण आहे. लठ्ठपणामुळे आतड्याचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, बीजांड कोशाचा तसेच स्वादूपिंड, जठर, अन्ननलिका, मूत्रपिंड व पित्ताशयाचा कॅन्सर होतो. योग्य वजन राखणे, योग्य व संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या तीन गोष्टींनी आपण ३३ टक्के कॅन्सरना प्रतिबंध करू शकतो.

आजमितीला जगभरात सुमारे ५४ टक्के लोक हे शहरात राहतात आणि इ. स. २०५० पर्यंत हाच आकडा ६६ टक्क्यांपर्यंत जाईल, शहरीकरणाचा हा वेग जसा वाढत जाईल. तसतशी बदलती जीवनशैली, आरोग्य समस्या, नागरी सुविधा यांना तोंड देण्यासाठी आपल्या पुढे अनेक आव्हाने उभी राहतील, म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकारे तसेच महापालिका सारख्या स्थानिक सरकारी संस्था व इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी सारख्या सामाजिक संस्था यांच्यामार्फत आपण आग्रहीपणे कॅन्सरसारख्या घातक, रोगाला प्रतिबंध करण्याच्या कामात पुढाकार घेऊन कार्यरत होणे आवश्यक आहे.

सोलापुरातील इंडियन कॅन्सर सोसायटीची स्थापना डॉ. सुशीला पाटील यांच्या पुढाकारातून १९८० साली झाली. तेव्हापासून ते आजतागायत या संस्थेमार्फत सातत्याने कॅन्सर निदान शिबिरे, जनजागृती व्याख्याने व प्रदर्शने, कॅन्सरविषयक उपचारासाठी मार्गदर्शन इ. उपक्रम राबवले जातात. संस्थेच्या रेल्वे लाईन्स स्थित वास्तूमध्ये मरणासन्न व आधारहीन कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी ‘शांतीनिकेतन’ नावाचे शुश्रुषा केंद्र मोफत चालवले जाते.

४ फेब्रुवारीच्या जागतिक कॅन्सर दिनानिमित्त आपण सगळ्या सुजाण नागरिकांनी आपापल्या परीने क ूंल्ल ंल्ल िक ६्र’’ या घोषवाक्यानुसार या घातक रोगाविरुद्धच्या व्यापक लढा उभारून त्यात सक्रिय सहभाग घ्यावा ही अपेक्षा.-डॉ. शिरीष कुमठेकर(लेखक सर्जन व कॅन्सरतज्ज्ञ आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरcancerकर्करोगHealthआरोग्यMedicalवैद्यकीय