आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 15:05 IST2019-01-16T15:01:27+5:302019-01-16T15:05:49+5:30
शिवसेनेसोबत युती व्हावी असा आमचा आणि आमच्या पदाधिका-यांचा प्रयत्न आहे.

आमच्यासोबत जो निवडणुकीत नसेल उसको हम पटक देंगे; अमित शहा यांच्यानंतर रावसाहेब दानवेंचा शिवसेनेला इशारा
सोलापूर : शिवसेनेसोबत युती व्हावी असा आमचा आणि आमच्या पदाधिका-यांचा प्रयत्न आहे. समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. मतांचे विभाजन टाळले पाहिजे. कारण तसे न झाल्यास त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल. पण निवडणुकीत जो आमच्यासोबत येईल त्याच्यासह आणि जो आमच्यासोबत नसेल उसको हम पटक देंगे, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बुधवारी सोलापुरात दिला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूरच्या सभेत शिवसेनेला पटक देंगे असा इशारा दिला होता. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रावसाहेब दानवे यांनी वरील खुलासा केला. निवडणुका जवळ येतील, तसे चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे कडवट टीका करीत आहेत. याबद्दल विचारले असता दानवे म्हणाले, एवढ्या मोठ्या पदावर असणाºया व्यक्तीबद्दल असे बोलू नये. पण ते बोलत आहेत हे चुकीचे आहे.