चालतं-फिरतं 'पाप' उघड : आलिशान कारमध्ये सुरू होतं लिंगनिदान केंद्र, बोगस डॉक्टर अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 08:59 IST2026-01-09T08:58:19+5:302026-01-09T08:59:07+5:30

बार्शीत शेतात कार लावून व्हायची 'चिमुकल्यांची कत्तल'

walking sin exposed diagnostic centre was opened in a luxury car bogus doctor arrested | चालतं-फिरतं 'पाप' उघड : आलिशान कारमध्ये सुरू होतं लिंगनिदान केंद्र, बोगस डॉक्टर अटकेत

चालतं-फिरतं 'पाप' उघड : आलिशान कारमध्ये सुरू होतं लिंगनिदान केंद्र, बोगस डॉक्टर अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क, कुसळंब (जि. सोलापूर) : बार्शी तालुक्यातील जामगाव (आ.) शिवारात एका आलिशान कारमधून चालवण्यात येणारे फिरते गर्भलिंग निदान आणि बेकायदा गर्भपात केंद्र उघडकीस आणून पोलिसांनी १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत माढा तालुक्यातील बोगस डॉक्टराला रंगेहाथ पकडण्यात आले. बुधवारी पहाटे  ४:४० च्या सुमारास जामगाव शिवारातील वाणेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पडीक शेतात अलिशान कार उभी होती. पोलिसांनी कारमधील दोन काळ्या सॅकची झडती घेतली असता हा प्रकार उघड झाला.

छाप्यात काय सापडले?

छाप्यात ३ लाख रुपयांची ‘झोन केअर’ चालू स्थितीतील पोर्टेबल सोनोग्राफी मशीन व प्रोब आढळले. त्यासोबतच गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मिफेप्रिस्टोन आणि मिसोप्रोस्टोल’ या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठा (१४४ सीलबंद गोळ्या) सापडला. गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्यांची ५१ रिकामी पाकिटे आणि रक्त लागलेले क्युरेटेज (गर्भपात साहित्य) तिथे सापडले. रक्तस्त्राव थांबवण्याचे इंजेक्शन, सलाईन बाटल्या, ग्लोव्हज आदी वैद्यकीय साहित्य जप्त केले गेले.
 

Web Title : चलती-फिरती लिंग निर्धारण रैकेट का भंडाफोड़; सोलापुर में फर्जी डॉक्टर गिरफ्तार

Web Summary : बारशी, सोलापुर में एक आलीशान कार से चल रहे लिंग निर्धारण और अवैध गर्भपात केंद्र का भंडाफोड़। पुलिस ने 18 लाख रुपये से अधिक का सामान जब्त किया और माधा से एक फर्जी डॉक्टर को गिरफ्तार किया। छापे में एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपात की गोलियां और चिकित्सा आपूर्ति मिली।

Web Title : Mobile Sex-Determination Racket Busted; Bogus Doctor Arrested in Solapur

Web Summary : A mobile sex-determination and illegal abortion center operating from a luxury car was exposed in Barshi, Solapur. Police seized equipment worth over ₹1.8 million and arrested a bogus doctor from Madha. The raid uncovered a portable sonography machine, abortion pills, and medical supplies.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.