शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे ड्रोनने हल्ले; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच
3
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
4
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
5
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
6
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
7
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
8
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
9
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
10
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
11
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
13
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
14
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
15
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
16
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
17
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
18
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
19
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
20
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."

‘यूपी’तून ‘व्होटिंग मशिन

By admin | Updated: August 5, 2014 01:26 IST

विधानसभेची तयारी: तीन पथके रवाना; १०,२०० नवीन मशिन येणार

 सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्याचे प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यासाठी १० हजार २०० मतदानयंत्रे (व्होटिंग मशीन) यूपीतून (उत्तर प्रदेश) मागविण्यात आली आहेत. याकामी तीन तहसीलदारांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असून, आठवडाभरात हा ‘लवाजमा’ सोलापुरात पोहोचेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत ७२०० मतदानयंत्रे (बॅलेट युनिट) आणि ३७०० कंट्रोल मशिन वापरली गेली. एका मतदान केंद्रासाठी एक बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिट वापरले जाते. दोन्ही लोकसभा मतदारसंघांत उमेदवारांची संख्या १६ पेक्षा जास्त असल्याने प्रत्येक मतदान केंद्रासाठी दोन बॅलेट युनिट आणि एक कंट्रोल युनिटचा वापर झाला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची वाढती संख्या गृहीत धरून नवीन व्होटिंग मशिन्स मागविण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशातील सहारनपूर, महाराजगंज, रामपूर येथून या मशिन्स आणण्यासाठी तीन तहसीलदारांची स्वतंत्र पथके पोलीस फौजफाट्यासह मंगळवारी (दि. २९ जुलै) रवाना झाली आहेत. सहारनपूरसाठी बाबुराव पवार (तहसीलदार, दक्षिण सोलापूर), रामपूरसाठी रमेश शेंडगे (तहसीलदार, माढा) व महाराजगंजसाठी सदाशिव पडदुणे (तहसीलदार, मोहोळ) यांची ही पथके आहेत. त्यांच्यासमवेत सहा कर्मचारी आणि चार पोलिसांची कुमक देण्यात आली आहे. रात्रीचा प्रवास टाळून मजल-दरमजल करीत या पथकांनी सोमवारी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. दोन दिवस या सर्व मशिन्सची कसून तपासणी केली जाईल. त्यानंतर त्या ताब्यात घेऊन मोठ्या कंटेनरमधून सोलापूरच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहेत. यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी अपेक्षित आहे. ---------------------कर्फ्युचा फटकासध्या सहारनपूर येथे कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. तहसीलदार बाबुराव पवार यांना यामुळे शहरात प्रवेश करणे अडचणीचे ठरले आहे. दुपारी दोन तास कर्फ्यू शिथिल करण्यात आल्यानंतर त्यांनी लगबगीने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.-------------------------अशा आहेत मशिन्ससोलापूरसह अनेक ठिकाणी सध्या वापरात असलेल्या व्होटिंग मशिन्स २००६ पूर्वीच्या आहेत. २००६ नंतर अद्ययावत बनावटीच्या मशिन्स निवडणूक आयोगाकडून पुरविल्या जात आहेत. यूपीतून येणाऱ्या मशिन्स नवीन आहेत. डिस्पले अंतर्गत रचना आणि मॉडेलमध्ये काहीसा फरक करण्यात आला आहे. -----------------------सहारनपूर येथून ७०० कंट्रोल युनिट, रामपूरहून २२०० बॅलेट युनिट (मतदान यंत्र), १७०० कंट्रोल युनिट तर महाराजगंज येथून ३७०० बॅलेट युनिट, १९०० कंट्रोल युनिट अशी १० हजार २०० युनिट सोलापूरसाठी मागविले आहेत.