भाजप-सेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, अशोक चव्हाण यांना घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 15:11 IST2018-09-04T15:10:37+5:302018-09-04T15:11:46+5:30

Unless the BJP-Sena pull down from power, this mass struggle will not stop, Ashok Chavan suffers from dizziness | भाजप-सेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, अशोक चव्हाण यांना घणाघात

भाजप-सेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही, अशोक चव्हाण यांना घणाघात

ठळक मुद्देखा़ चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती

मंगळवेढा : भाजप शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही त्यामुळे ते प्रश्न सोडवू शकत नाहीत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे

 मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आहे त्यांनतर बाजार मैदानात सभा पार पडली़ त्यावेळी ते बोलत होते़   व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ भारत भालके, आ रामहरी रुपनवर, आ विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर, मारुती वाकडे, नगरसेवक राहुल सांवजी, महेश दत्तू,भारत बेदरे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, मल्लिकार्जुन बिराजदार ,  आदी उपस्थित होते 

मंगळवेढा येथे जनसंघर्ष सभेला मार्गदर्शन करताना खा़ चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले की,  भाजप सरकारच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात महाराष्ट्राचे वाटोळे झाले आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे राज्याची अधोगती झाली आहे. चार वर्षात घोटाळे करण्याशिवाय आणि खोटी आश्वासने देण्यापलिकडे या सरकारने काही केले नाही. राज्यात शेतकरी आत्महत्या करित आहेत. बेरोजगारीला कंटाळून सुशिक्षित बेरोजगार तरूण आत्महत्या करित आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा व इतर समाजातील तरूण आत्महत्या करित आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार प्रश्न चिघळवत ठेवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहे. राजकीय फायद्यासाठी राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधा-यांकडून सुरु आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही भाषण झाले़

Web Title: Unless the BJP-Sena pull down from power, this mass struggle will not stop, Ashok Chavan suffers from dizziness