शेततळ्यात बुडून बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 16:30 IST2020-11-04T16:30:17+5:302020-11-04T16:30:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

शेततळ्यात बुडून बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील घटना
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यात गोणेवाडी येथे शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. गोणेवाडी गावात मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरातील लोक शेतात काम करण्यासाठी गेले होते. यातील मयत मुलगी (वय ५) व मुलगा (वय ३) हे दोघे सख्खे भाऊ बहीण अंगणात खेळत होते. जनावरांच्या पाण्यासाठी घरासमोर शेततळे करण्यात आले होते. त्याच शेतातल्यामध्ये खेळत पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.