अल्पवयीन पुतणीला गुंगीचे औषध पाजून काकाचा अत्याचार
By रूपेश हेळवे | Updated: June 24, 2023 18:27 IST2023-06-24T18:26:32+5:302023-06-24T18:27:48+5:30
सोलापूर : बारावर्षीय पुतणी घरात एकटी असताना काकाने तिला मारहाण केली अन् गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. पीडित ...

प्रतिकात्मक फोटो
सोलापूर : बारावर्षीय पुतणी घरात एकटी असताना काकाने तिला मारहाण केली अन् गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगूनही आईने ती बाब लपवून ठेवली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काका आणि पीडितेच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुतणी घरात एकटी असल्याची संधी साधून काका तिच्या घरात घुसला. तिला सातत्याने मारहाण करीत त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेने आपल्या आईला सांगितल्यानंतर तिने ‘ही बाब कोणाला सांगू नको. नाहीतर आरोपी हा आपल्या दोघांना मारून टाकील’, असे सांगून ही घटना लपवून ठेवली. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काका व आईवर गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पुणे येथे १२ जून रोजी दाखल झाला होता. तेथून हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.