शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष; माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 18:46 IST

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरुन वाद समोर आला आहे.

मुंबई - महाविकास आघाडी एकत्रितपणे पुढील निवडणुक लढवले. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी मजबुतीने प्रयत्न करेल, असे तिन्ही पक्षांकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र, आता लोकसभेच्या जागा वाटपावरुन तिन्ही पक्ष आमने-सामने आल्याचं दिसून येत आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी जागा वाटपाबाबत विधान करताना आमच्या १९ जागा आहेत, असे म्हटले आहे. मात्र, सध्या शिवसेनेकडे केवळ ५ खासदार असल्याचं सांगत राष्ट्रवादीने त्यांना फटकारलं आहे. तर, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना हा ३ ऱ्या क्रमांकाच पक्ष असल्याचं म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरुन वाद समोर आला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी हा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं. त्यावर, काँग्रेसनेही पलटवार केला आहे. लहान भाऊ कोण अन् मोठा भाऊ कोण यावरून वादाचे सूर निघू लागले आहेत. काँग्रेसने तर लहान-मोठे जाऊ द्या, राष्ट्रवादीचा जन्मच आमच्या उदरातून झाला असल्याचा टोला राष्ट्रवादीला लगावला आहे. तर, या वादावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य करताना उद्धव ठाकरेंची शिवसेना ३ ऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे म्हटले. 

पक्षाच्या वाढीकरता प्रत्येक पक्षाचे नेते उत्साहवर्धक स्टेटमेंट देत असतात त्यात काही गैर नाही. आजच्या महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. काँग्रेस दोन नंबरचा आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हा तिसऱ्या नंबरचा पक्ष आहे. त्यामुळे विधान करण्यामध्ये काही चुकीचं नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. तसेच, जागा वाटापामध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन सूत्र वापरत होतो. आतापर्यंत जे जे निकाल आहेत, त्याचा विचार करून जागा वाटपाचा निर्णय होईल. या घडीला भाजपाला कोणता पक्ष पराभूत करेल यावर चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे ह्या स्टेटमेंटला फार काही विशेष अर्थ नाही. जागा वाटपाकरता गंभीरतेने बसून एक सूत्र ठरवू, असेही चव्हाण यांनी सांगितले. 

आमच्या १९ जागा कायम आहेत - राऊत

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. परंतु अद्याप जागावाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरला नाही. लवकरच प्रमुख नेत्यांची बैठक होईल. त्यात जागावाटपाची चर्चा होईल. आमचा १९ चा आकडा कायम आहे. आम्ही या जागा जिंकलेल्या आहेत, असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. महाविकास आघाडी मजबूत आहे. १९ आकडा कायम राहील. महाराष्ट्रात शिवसेना १९ आकडा कायम ठेवेल, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. प्रमुख नेत्यांची बैठक होईल त्यात निर्णय होईल असंही त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवार