सोलापुरात दोन मजली इमारत कोसळली; मध्यप्रदेशचे चार मजूर जखमी
By Appasaheb.patil | Updated: August 8, 2020 18:23 IST2020-08-08T18:15:04+5:302020-08-08T18:23:51+5:30
सोलापुरातील घटना; स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना घडली घटना

सोलापुरात दोन मजली इमारत कोसळली; मध्यप्रदेशचे चार मजूर जखमी
सोलापूर : शहरातील नवीवेस ते भैय्या चौक मार्गावर असलेल्या पाटील चाळीतील दोन मजली इमारत कोसळून चार मजूर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. घटनेतील जखमी मजूर हे मध्यप्रदेशातील असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेत तहलिय्या वसुनिया, निलेश फुलसिंग बोरीया, जिया समशु वसुनिया (रा़ तिघेही तोरोनिया राज्य - मध्यप्रदेश) असे जखमींची नावे आहेत. जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोलापूर शहरात सध्या सर्वत्र स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी कामे सुरू आहेत. नवीवेस ते भैय्या चौक दरम्यान असलेल्या पाटील चाळीत ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे़ या कामासाठी जेसीबी व पोकलेन लावण्यात आले असून या यंत्राच्या व्हायब्रेशनमुळे व पावसाच्या पाण्याने भिजलेली जुनी असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळली.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकचे उपायुक्त पंकज जावळे, अग्शिनशामक दलाचे प्रमुख केदार आवटे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले आदी घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या ढिगाºयाखाली अडकलेल्यां काढण्याचे मदतकार्य सुरू असल्याचे सांगण्यात आले.