काळीज पिळवटून टाकणारी घटना; ट्रॅक्टरखाली चिरडून दोन कोवळ्या जीवांनी गमावले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 10:42 IST2024-12-09T10:40:55+5:302024-12-09T10:42:00+5:30

Accident News: ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून एका ४ वर्षीय बालिकेसह तिच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला.

Two sisters died on the spot after being crushed under the tractor in mohol taluka accident | काळीज पिळवटून टाकणारी घटना; ट्रॅक्टरखाली चिरडून दोन कोवळ्या जीवांनी गमावले प्राण

काळीज पिळवटून टाकणारी घटना; ट्रॅक्टरखाली चिरडून दोन कोवळ्या जीवांनी गमावले प्राण

Mohol Accident ( Marathi News ):  उसाच्या फडात चालू ट्रॅक्टरवर बसण्यासाठी चढत असताना, अचानक ट्रॅक्टरचा गिअर पडून ट्रॅक्टर पुढे गेल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून एका ४ वर्षीय बालिकेसह तिच्या बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील आष्टे गावाच्या हद्दीत ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. नीता राजू राठोड आणि अतिश्री राजू राठोड अशी मृत बहिणींची नावे आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानूबाई राजू राठोड (रा. पाटागुडा, ता.जिवती, जि. चंद्रपूर) यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक सुनील गुलाब राठोड (रा. डिगरस तालुका - कंधार, जिल्हा नांदेड) याच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबात अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांना पती, पाच मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पती राजू राठोड हा साखर कारखाना यांच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर क्र.एम.एच. २४ डी. ७१४४ काम करत होते. दि. ७ डिसेंबर रोजी सायं. ६:१५ चे सुमारास फिर्यादी आणि त्यांचे पती आष्टे, ता. मोहोळ येथे शेतातील ऊस तोडणीचे काम करीत होते. 

ऊसतोडीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करून बांधावर चालू आवस्थेत असलेल्या टॅक्टरवर नीता राठोड (२०) ही लहान बहीण अतिश्री राठोड (४) हिला कंबरेवर घेऊन ट्रॅक्टरमध्ये चढत असताना चालू ट्रॅक्टरचा अचानक गीयर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामुळे दोघी बहिणी खाली पडल्याने ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. या अपघातात दोघीही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले असल्याची फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two sisters died on the spot after being crushed under the tractor in mohol taluka accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.