सोलापूर जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह; ३१ बाधित रूग्णांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 17:10 IST2020-06-08T17:08:51+5:302020-06-08T17:10:33+5:30
जामगाव अन् कुंभारी विडी घरकुलमध्ये आढळले नवे रूग्ण;

सोलापूर जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह; ३१ बाधित रूग्णांनी केली कोरोनावर मात
ठळक मुद्दे- सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली- कोरोनामुक्तीच्या दिशेने सोलापूर जिल्ह्याची वाटचाल- सारीबरोबरच कोरोनाचेही रूग्ण आढळून येत आहेत़
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून) दोन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. दरम्यान, सोमवारी ३१ बाधित रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ बार्शी तालुक्यातील जामगांव अन् कुंभारी विडी घरकुलमध्ये नव्याने रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये सोमवारी ८ रूग्णांचा अहवाल प्राप्त झाला, त्यापैकी ६ रूग्ण निगेटिव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़ आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात ८२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ४५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.