बार्शी-सोलापूर रोडवरील अपघातात दोघे ठार

By शीतलकुमार कांबळे | Published: April 11, 2024 06:37 PM2024-04-11T18:37:49+5:302024-04-11T18:38:40+5:30

सोलापूर रोडवरील रेल्वेपुलाजवळ अनोळखी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरात धडक दिली.

Two killed in accident on Barshi-Solapur road | बार्शी-सोलापूर रोडवरील अपघातात दोघे ठार

बार्शी-सोलापूर रोडवरील अपघातात दोघे ठार

बार्शी : सोलापूर रोडवरील रेल्वेपुलाजवळ अनोळखी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस जोरात धडक दिली. त्यात एकजण जागीच मरण पावला, तर त्याच्या साथीदाराचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

राजू महादेव जमदाडे (वय ५६, रा. सावळे गल्ली, बार्शी) हे जागीच मरण पावले, तर साथीदार बाबूराव लक्ष्मण आडगळे (६५, रा. इर्ले, ता. बार्शी) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल नीलेश आनंतकवळस यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलिस व त्याच्या पथकाने अपघातस्थळी धाव घेतली असता एक दुचाकी (एम. एच.१२ / एच. एम. ९४८३) रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. तेथे जमलेल्या लोकांशी संवाद साधला असता अपघातातील दोघांनाही एका खासगी रुग्णवाहिकेतून उपचारास पाठविल्याचे सांगितले. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली असता राजू जमदाडे हे उपचारापूर्वीच मरण पावले पावले, तर बाबूराव आडगळे हे गंभीर जखमी झाले, अशी माहिती मिळाली.

Web Title: Two killed in accident on Barshi-Solapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.