शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयपीं’साठी दोन हेलिपॅड तयार

By admin | Updated: July 8, 2014 01:16 IST

शासकीय पूजा; मुख्यमंत्र्यांसह सहकारमंत्री राहणार उपस्थित

जगन्नाथ हुक्केरी ल्ल पंढरपूर‘पवित्र ते कुळ पावन तो देश। जेथे हरिचे दास जन्म घेती।’ या संत वचनाप्रमाणे पंढरीची ओढ जसी वारकऱ्यांना लागली त्याचपद्धतीने शासकीय महापूजेचे वेध मुख्यमंत्र्यांना लागले असून, पंढरीचा राणा विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री व सहकार मंत्री मंगळवारी दुपारी पंढरीत येणार असून, यासाठी उपविभागीय कृषी कार्यालयाच्या आवारात दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.आषाढी सोहळ््याला शासकीय महापूजा करण्याचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असून, कार्तिकीला उपमुख्यमंत्री महापूजा करतात. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंगळवारी दुपारपर्यंत पंढरीत दाखल होणे अपेक्षित असून, त्यांच्याबरोबर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल हेही उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी पंढरपूर—कराड रस्त्यावरील उपविभागीय कृषी कार्यालयाच्या आवारात दोन हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. त्यांचा येण्याचा मार्ग अद्याप निश्चित नसला तरी प्रशासकीय नियोजन मात्र करण्यात आले आहे. याशिवाय मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह, आ. बबनराव पाचपुते, विविध पक्षाचे प्रदेशचे पदाधिकारीही पंढरीला हजेरी लावून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. यामुळे पक्षाचे पदाधिकारी त्यांचे नियोजन करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री पंढरीत आल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याबरोबरच आ. भारत भालके यांच्या निवासस्थानी अल्पोपहार घेणार असून, आषाढी एकादशीदिवशी कल्याणराव काळे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार आहे. आषाढी वारीत काँग्रेस कार्यकर्त्यांना मेळाव्याद्वारे मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्याची प्रथा असल्याने याचेही नियोजन करण्यात येत आहे. --------------------------गोहत्या बंदीवर होईल निर्णय?गोहत्यावर बंदी घालण्यासाठी बंडातात्या कराडकर हे शिवाजी चौकात आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा दिला असून, ते पर्यायी मार्गाने शासकीय पूजा करण्यासाठी गेल्यास आम्ही त्यांना विरोध करणार नाही, असाही त्यांनी पवित्रा घेतला आहे. यामुळे मुख्यमंत्री बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेल्या गोहत्या बंदी कायद्याबाबत काही तरी निर्णय घेतील का, याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आह