कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यात पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 12:01 IST2020-04-19T11:55:59+5:302020-04-19T12:01:16+5:30
भोसे (ता. पंढरपूर) येथील घटना; एकीचा मृतदेह सापडला, दुसरीचा शोध सुरु

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बंधाऱ्यात पडून मृत्यू
पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथील दोन मुली बंधाºयातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र त्या पाय घसरल्याने त्या बंधाºयातील पाण्यात पडल्या. त्यापैकी एकीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे. तर दुसरीचा शोध सुरु आहे. मयत झालेल्या मुलीचे नाव आरती निलेश सोनवणे (वय १०) असे आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील इयत्ता पाचवीमध्ये शिकणाºया आरती निलेश सोनवणे आणि वैष्णवी महादेव गाडे या मुली रविवारी सकाळी नऊ वाजता नेहमी प्रमाणे घराजवळील बंधाºयातील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचा पाय घसरुन दोघीही बंधाºयातील पाण्यात पडल्या.
बराच वेळ झाला तरी मुली परत आल्या नाहीत. हे लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. गावकºयांनी बंधाºयातील पाण्यातून आरती नीलेश सोनवणे हिचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर वेष्णवी महादेव गाडे हिचा शोध सुरु आहे. ही घटना समजताच पोलीसांनी घटना स्थळी भेट दिली आहे.