वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:52 IST2018-05-21T12:52:31+5:302018-05-21T12:52:31+5:30

Trying to kill the police personnel by the villagers of the villagers | वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

वाळु तस्कारांकडून पोलीस कर्मचाºयास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

ठळक मुद्दे- अवैध वाळु वाहतुकदारांची मुजोरी वाढली- चोरटी वाळु वाहतुक वाढली- महसुल प्रशासनाकडून व्हावी कडक कारवाई

सोलापूर : अवैधरित्या वाळु वाहतुक करणाºया ट्रॅक्टर थांबविण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाºयाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील खळवे गावच्या शिवारात विठ्ठलवाडी रोडवरील हुंबेवस्तीजवळ घडली़

याबाबत पोहेकॉ एल़ वाय़ पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आण्णासाहेब श्रीकांत कदम (वय ४२) व अस्मित आण्णासाहेब कदम या दोघांविरूध्द वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अस्मित आण्णासाहेब कदम हा आपल्या ताब्यातील बिगर नंबरचा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉलीमधून अवैधरित्या वाळुची वाहतुक करीत होता़ याचवेळी पोलीस नाईक एल़ वाय पिंगळे हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांनी अवैधरित्या जात असलेला ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला़ यावेळी आरोपी अस्मित कदम याने ट्रॅक्टर न थांबविता पोलीस नाईक पिंगळे यांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून जखमी केले़ शिवाय सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वेळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि कोरके हे करीत आहेत़ 

Web Title: Trying to kill the police personnel by the villagers of the villagers