ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

By Admin | Updated: May 20, 2014 00:47 IST2014-05-20T00:47:34+5:302014-05-20T00:47:34+5:30

सांगोला : भरधाव वेगाने जाणार्‍या मालट्रकने दुचाकीस समोरुन जोराची धडक दिल्याने एक जण ठार

Truck - Two wheelers hit a truck | ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार

 

सांगोला : भरधाव वेगाने जाणार्‍या मालट्रकने दुचाकीस समोरुन जोराची धडक दिल्याने एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सांगोला-मिरज रोडवरील हातीद गावाशेजारील श्रीराम हायस्कूलसमोर घडली. अमोल दिलीप मोरे (वय २२, रा. कोळे, ता. सांगोला) असे अपघातात मरण पावलेल्या युवकाचे नाव असून, सोमनाथ शिवाजी सरगर, अक्षय ईश्वर वाघमारे व आनंदा महादेव सुतार (सर्व रा. कोळे, ता. सांगोला) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. कोळे येथील अमोल मोरे, सोमनाथ सरगर, अक्षय वाघमारे व आनंदा सुतार हे चौघे दुचाकी(क्र. एम. एच. ४५-८३७८) वरुन सांगोला-मिरज रोडवरील पाचेगाव खुर्द फाट्यावरील चांदणी ढाब्यावर जेवण करण्यासाठी आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणखाण उरकून हे चौघे दुचाकीवरुन सांगोला-मिरज रोडने घरी जाण्यासाठी निघाले असता मिरजकडून भरधाव वेगाने येणार्‍या मालट्रक(क्र. एम. एच. ०६ ७०८१)ने हातीद गावाजवळील श्रीराम हायस्कूलजवळ दुचाकीस समोरुन जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात अमोल दिलीप मोरे हा गंभीर मार लागून, जागीच ठार झाला तर सोमनाथ सरगर, अक्षय वाघमारे, आनंदा सुतार हे गंभीर जखमी झाले आहेत. सोमनाथ शिवाजी सरगर याने सांगोला पोलिसात खबर दिली असून तपास हवालदार कैलास मारकड करीत आहेत.

 

Web Title: Truck - Two wheelers hit a truck