मोहोळजवळ उड्डाण पुलावरून रेल्वे रुळावर ट्रक पडला
By Appasaheb.patil | Updated: August 29, 2019 10:11 IST2019-08-29T10:10:08+5:302019-08-29T10:11:22+5:30
सोलापूर विभागातून जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने; रुळावरून ट्रक हटवण्याचे काम वेगात सुरू

मोहोळजवळ उड्डाण पुलावरून रेल्वे रुळावर ट्रक पडला
सोलापूर : सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ जवळ असलेल्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात येणारा ट्रक रेल्वे रुळावर कोसळला. दरम्ययान, सोलापूर विभागातून धावणार्या रेल्वे गाड्या उशिरानेे धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानेे दिली.
याबाबत वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमच्याकडे देखील आपल्यासारखीच माहिती आहे. आम्ही आमची एआरटी (अपघात निवारण व्हॅन) सोलापुरातून हलविला आहे. ते लवकरच घटनास्थळी पोहोचेल आणि वाहतुकीचा ट्रॅक साफ करेल असे ही त्यांनी सांगितले.