बेगमपूर येथे ट्रक अन् चारचाकीचा अपघात; सोलापुरातील एकाचा मृत्यू, दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 14:21 IST2021-09-21T14:20:37+5:302021-09-21T14:21:02+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग

बेगमपूर येथे ट्रक अन् चारचाकीचा अपघात; सोलापुरातील एकाचा मृत्यू, दोघे जखमी
कामती:मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे आज मध्यरात्री ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दोघे जखमी झाले.जखमींना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. यात सुनील वाघमारे (वय ३१ वर्ष रा.टिळक नगर,सोलापूर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गिरीश माने (वय ३२), हर्षवर्धन सर्वगोड (वय ३५ दोघे रा.गजानन नगर,सोलापूर) हे दोघे जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रानुसार दि.२० रोजी गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे वाहन क्रमांक एमएच १३ डिटी १८९१ या चारचाकी वाहनाने सांगोला येथे गेले होते. संगोला येथील काम संपवून ते सांगोला येथून सोलापूरला निघाले होते. दि.२१ च्या मध्यरात्री ०१ वा. यांचे वाहन मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपूर येथे एसबीआय बँकेसमोर आले असता समोरून येणारा ट्रक एमच १३ डीक्यू १२७० याने यांच्या वाहनाला समोरून धडक दिली. धडक देऊन वाहन चालक पळून गेला आहे. या धडकेत सुनील वाघमारे हे मयत झाले असून गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अशा आशयाची फिर्याद कामती पोलिसात हर्षा कुमार कांबळे यांनी दिली आहे. पुढील तपास कामती पोलीस ठाणे करीत आहे.