होर्ती गावाजवळ ट्रक व कारचा अपघात, सोलापुरचे तिघे ठार
By Appasaheb.patil | Updated: January 29, 2019 15:35 IST2019-01-29T15:29:35+5:302019-01-29T15:35:10+5:30
सोलापूर : इंडी तालुका (जि़ विजयपूर) जवळील होर्ती गावाजवळ मालट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत सोलापूर जिल्ह्यातील तिघांचा ...

होर्ती गावाजवळ ट्रक व कारचा अपघात, सोलापुरचे तिघे ठार
सोलापूर : इंडी तालुका (जि़ विजयपूर) जवळील होर्ती गावाजवळ मालट्रक व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत सोलापूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे़ ठार झालेले तिघे जण दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावातील असल्याची प्राथमिक माहिती होर्ती पोलीसांनी दिली़ हा अपघात मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास घडला.
धोत्री (ता़ दक्षिण सोलापूर) येथील कुटुंबिय कारने विजापूरकडे जात होते़ विजापूरपासून काही अंतरावर असलेल्या होर्ती गावाजवळ भरधाव वेगात येत असलेल्या मालट्रकची कारला धडक बसली़ हा अपघात इतका भीषण होता की कारच्या तिन्ही बाजू चक्काचूर झाली आहे़ या अपघातानंतर होर्ती पोलीसांनी घटनास्थळाला भेट देऊन उर्वरित जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल केले आहे.
-सविस्तर वृत्त थोडक्यात वेळात...