सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
By आप्पासाहेब पाटील | Updated: June 5, 2025 09:06 IST2025-06-05T09:04:35+5:302025-06-05T09:06:12+5:30
Solapur Pune Highway Accident: गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला

सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
Solapur Pune Bus Accident: पुणेमहामार्गांवर आढेगाव शिवारात खाजगी गाडीच्या बसचालकाला झोप लागल्याने बस खड्यात पलटी होऊन अपघाताची घटना घडली. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा मोठा अपघात झाला. या अपघातात पुणे व मराठवाड्यातील ३० प्रवाशी जखमी झाले असून २० गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
#BREAKING: 30 injured, 20 seriously, in Solapur-Pune #highway bus #accident near #Adhegaon village after driver fell #asleep. #Injured rushed to #hospital, treatment underway. #SolapurPuneHighway#BusAccidentpic.twitter.com/JMZtiviKYB
— Lokmat Times Nagpur (@LokmatTimes_ngp) June 5, 2025
दरम्यान, शिरपूर लातूर येथून खासगी बस एमएच ४८ के १९१८ ही बुधवारी रात्री उशिरा पुण्याकडे निघाली होती. सोलापूर पुणे महामार्गावरील आढेगाव शिवारात धावती बस अचानक पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. याचवेळी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्या चालकांनी व परिसरातील लोकांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठी धावपळ केली. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.