Today's expansion of Solapur University; The decision to name the 'Ahilyadevi University' | सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; ‘अहिल्यादेवी विद्यापीठ’ यांचे नाव देण्याचा निर्णय

सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; ‘अहिल्यादेवी विद्यापीठ’ यांचे नाव देण्याचा निर्णय

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या निर्णयावर मंगळवारी मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. आज सोलापूर विद्यापीठ नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, आज बुधवारी रोजी होणाºया नामविस्तार कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आ़ नारायण पाटील, खा़ महात्मे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कुलगुरू डॉ़ मृणालिनी फडणवीस आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील सर्व विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने  घेतला. 
 

Web Title: Today's expansion of Solapur University; The decision to name the 'Ahilyadevi University'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.