शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

सोलापूर शहरासाठी उजनीतून तिबार पंपिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 1:41 PM

दुष्काळामुळे इतिहासात पहिल्यांदाच नवी यंत्रणा लावण्याची वेळ

ठळक मुद्देउजनी धरणात सध्या उणे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी धरणाची पाणी पातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर महापालिकेने उजनी पंपगृहासाठी दुबार पंपिंग सुरू केले होतेमहापालिकेने आणखी २०० मीटर आत जाऊन पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला

सोलापूर : शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेने उजनी धरणातून बुधवारी तिबार पंपिंग सुरू केले. इतिहासात पहिल्यांदाच तिबार पंपिंग करण्याची वेळ आली आहे. 

उजनी धरणात सध्या उणे ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. धरणाची पाणी पातळी उणे ३५ टक्क्यांखाली गेल्यानंतर महापालिकेने उजनी पंपगृहासाठी दुबार पंपिंग सुरू केले होते. दुबार पंपिंगसाठी धरण काठावरील पंपगृहापासून १०० मीटर आत पंपिंग यंत्रणा उभारली जाते. यादरम्यान उजनी धरणातून औज बंधाºयासाठी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत आणखी घट झाली. दुबार पंपिंगच्या उपशावर परिणाम झाला. महापालिकेने आणखी २०० मीटर आत जाऊन पाणी उपसा करण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी पॅनेरियल कंपनीमार्फत भाडेतत्त्वावर पंपिंगची यंत्रणा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी ६० अश्वशक्तीचे दहा पंप लावण्यात आले आहेत. यातील आठ पंप दररोज पाणी उपसा करुन थेट पंपगृहाच्या चारीत टाकतील. दररोज ८० एमएलडी पाणी उपसा करुन देण्याचे बंधन या कंपनीला घालण्यात आले आहे. 

महापालिकेच्या इतिहासात प्रथम तिबार पंपिंग करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी केवळ चार वेळा दुबार पंपिंग करण्यात आले होते. आता चांगला पाऊस होऊन उजनी धरणात चांगले पाणी येईपर्यंत तिबार पंपिंगचे काम सुरू राहणार आहे. 

आयुक्तांच्या उपस्थितीत झाली चाचणी - मनपा आयुक्त दीपक तावरे, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख गंगाधर दुलंगे, पाणी पुरवठा उपअभियंता संजय धनशेट्टी, मनोज यलगुलवार यांच्या उपस्थितीत धरण काठावर बुधवारी तिबार पंपिंगच्या कामाची चाचणी घेण्यात आली.  बुधवारी सायंकाळपासून एक-एक पंप चालू होईल. दोन दिवसांत पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळ