महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

By आप्पासाहेब पाटील | Updated: May 26, 2025 11:59 IST2025-05-26T11:59:15+5:302025-05-26T11:59:30+5:30

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पुराच्या पाण्यात ६ नागरिक अडकले होते. इंदापूर येथे NDRF ची टीम आलेली होती. तीच टीम कुरबावी गावात येऊन पहाटे साडेतीन वाजता सहा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

Three sadhus who went to worship in the temple of Mahadev got trapped in the temple due to flood water; Incident in Solapur district | महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू पुराच्या पाण्यामुळे मंदिरात अडकले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू गावात पूर आल्याने मंदिरात अडकलेले आहेत.  त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे गावात पोहचत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिली. 

दरम्यान, माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पुराच्या पाण्यात ६ नागरिक अडकले होते. इंदापूर येथे NDRF ची टीम आलेली होती. तीच टीम कुरबावी गावात येऊन पहाटे साडेतीन वाजता सहा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

 गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Three sadhus who went to worship in the temple of Mahadev got trapped in the temple due to flood water; Incident in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.