आषाढी यात्रेतील तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 07:23 PM2019-06-29T19:23:15+5:302019-06-29T19:26:53+5:30

श्री संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस बंद

For the three days of the Ashadhi yatra, the ban on liquor sales in Pandharpur | आषाढी यात्रेतील तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी 

आषाढी यात्रेतील तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी 

Next
ठळक मुद्देपंढरपूर शहरातील आणि शहरापासून पाच किलोमीटर  परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य दुकाने सायंकाळी पाच नंतर बंद ठेवण्यात येतीलजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपुरात तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवली

पंढरपूर  : आषाढी सोहळ्या दरम्यान पंढरपूर शहर आणि शहरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य विक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सोहळ्यानिमित्त लाखो भाविक मोठ्या श्रध्देने पंढरपुरात दाखल होतात. त्यांच्या भावनांचा विचार करत व वारकºयांच्या, महाराज मंडळीच्या मागणी मान्य करत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपुरात तीन दिवस मद्य विक्री बंद ठेवली आहे.

 ११, १२ आणि १३ जुलै २०१९ रोजी पूर्ण दिवस आणि पंढरपूर शहरातील आणि शहरापासून पाच किलोमीटर  परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य दुकाने सायंकाळी पाच नंतर बंद ठेवण्यात येतील. 

त्याचबरोबर श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी ही देशी विदेशी मद्य विक्री दुकान पूर्ण दिवस बंद ठेवली जाणार आहेत. 

 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अनुसार मिळालेल्या अधिकारानूसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
--------
या ठिकाणी एक दिवस बंद
६ जुलै २०१९ नातेपुते येथे पूर्ण दिवस बंद राहतील. ७ जुलै २०१९ येथे माळशिरस, अकलूज पूर्ण दिवस बंद राहतील. ८ जुलै २०१९ रोजी वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर, येथील दुकाने बंद राहतील. ९ जुलै २०१९ रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली येथील दुकाने बंद राहतील. १० जुलै २०१९ रोजी वाखरी येथील दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहे.

Web Title: For the three days of the Ashadhi yatra, the ban on liquor sales in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.