तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गर्भवतीने दिला होता बाळाला जन्म; आता कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:59 IST2025-12-17T15:56:43+5:302025-12-17T15:59:08+5:30

तेरा वर्षाच्या मुलीला आमिष दाखवून अनेकवेळा तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

Thirteen-year-old girl raped, pregnant woman gave birth to baby; Now court has imposed heavy punishment | तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गर्भवतीने दिला होता बाळाला जन्म; आता कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा

तेरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गर्भवतीने दिला होता बाळाला जन्म; आता कोर्टाने ठोठावली मोठी शिक्षा

तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आणि तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली होती. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याचे कृत्य सत्य असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपी विकास दिगंबर शिंदे (वय ५०, रा. मनोहरनगर, झोपडपट्टी) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेप व वीस हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

आरोपीने पीडितेच्या थंड पेयात काही तरी मिसळून पाजल्याने ती चक्कर येऊन पडली. तेव्हा त्याने पीडितेवर अत्याचार केला. ही बाब पीडितेच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आईने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

आमिष दाखवून आरोपीने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्यावर अत्याचार केला. यातून पीडितेस झालेल्या बाळाचे जनक आरोपी विकास असल्याचे डी.एन.ए. अहवालावरून व साक्षीपुराव्याद्वारे सरकारी वकिलांनी निदर्शनास आणले.

न्यायालयाने आरोपी विकास शिंदे यास भादंवि कलम ३७६, ३ प्रमाणे आजन्म कारावासाची शिक्षा व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. शिवाय मनोधैर्य योजनेखाली रक्कम पीडितेस देण्याचा आदेश विधी सेवा प्राधिकरण यांना केला.

Web Title : 13 वर्षीय लड़की से बलात्कार: अदालत ने दोषी को आजीवन कारावास की सजा सुनाई

Web Summary : एक व्यक्ति को 13 वर्षीय लड़की से बलात्कार के आरोप में आजीवन कारावास की सजा सुनाई गई, जिसने एक बच्चे को जन्म दिया। अदालत ने जुर्माना भी लगाया। आरोपी ने उसे नशीला पदार्थ पिलाया, जिसके कारण हमला और बाद में गर्भावस्था हुई, जिसकी डीएनए से पुष्टि हुई।

Web Title : Rape of 13-Year-Old: Court Sentences Perpetrator to Life Imprisonment

Web Summary : A man received a life sentence for raping a 13-year-old, who gave birth. The court also imposed a fine. The accused had drugged her drink, leading to the assault and subsequent pregnancy, confirmed by DNA.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.