सकाळी त्या कॉलेजच्या गेल्या अन् दुपारी चोरट्यांनी घर साफ केलं...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 14:33 IST2020-09-11T14:31:36+5:302020-09-11T14:33:10+5:30

मड्डीवस्तीत प्राध्यापिकेचे घर फोडले; अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

Thieves cleaned the house in the morning and afternoon of that college ...! | सकाळी त्या कॉलेजच्या गेल्या अन् दुपारी चोरट्यांनी घर साफ केलं...!

सकाळी त्या कॉलेजच्या गेल्या अन् दुपारी चोरट्यांनी घर साफ केलं...!

ठळक मुद्देघरात प्रवेश करून पाहिले असता कपाटातील दोन लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आलेयाप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास फौजदार बोराडे करीत आहेत

सोलापूर : भवानी पेठ, मड्डी वस्ती येथील द्वारका विहार येथील प्राध्यापिकेचे घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील दोन लाख ४१ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. ही चोरी दि. ९  सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनच्या दरम्यान झाली. 

 विजया गुलाबचंद तडकल (वय ४३, रा. द्वारका विहार, मड्डी वस्ती, भवानी पेठ) या एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरी करतात. नेहमीप्रमाणे त्या सकाळी घराला कुलूप लावून कॉलेजला गेल्या होत्या. कॉलेजवरून घरी आल्यानंतर त्यांना दाराला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले.

घरात प्रवेश करून पाहिले असता कपाटातील दोन लाख ४१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तपास फौजदार बोराडे करीत आहेत. 

Web Title: Thieves cleaned the house in the morning and afternoon of that college ...!