शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय क्षेत्रात कष्टाशिवाय पर्याय नाही

By admin | Updated: June 28, 2014 00:44 IST

प्रकट मुलाखत : मृण्मयी देशपांडे यांचे मत

सोलापूर : सध्या चित्रपट, नाटक आदी क्षेत्रात अनेक चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नव्या पिढीने कष्टाची तयारी ठेवली पाहिजे, त्याला पर्याय नाही, करण्यासारखे खूप काही आहे, असे आवाहन सिने अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी केले. शिवछत्रपती रंगभवन येथे जनसेवा संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या प्रतापसिंह मोहिते-पाटील सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘प्रकट मुलाखत’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन मनपाचे प्रशासनाधिकारी विष्णू कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समर्थ बँकेचे संचालक प्रशांत बडवे, प्रयोग परिनिरीक्षक मंडळ सदस्य शिवानंद चलवादी, महिबूब तांबोळी, अभिराज शिंदे, निखिल सावंत, प्रशांत गायकवाड, ज्ञानेश्वर जन्मले, बिरू मोटे, तुकाराम बिराजदार, मैनुद्दीन मुलाणी, बापू सलवदे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अभिनय क्षेत्र खूप चांगले आहे. या क्षेत्रात येण्यापूर्वी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की आपण अभिनय करू शकतो का? स्वत: आपण या क्षेत्राकडे कोणत्या नजरेने पाहतो. जेव्हा स्वत:ला विश्वास बसेल की आपण हे करू शकतो तेव्हा कष्टाची तयारी ठेवून या क्षेत्रात आले पाहिजे. मनापासून जितके काम कराल तितके आपल्यासाठी कमी आहे. दिग्दर्शन करायला आवडेल का? या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, एखाद्या चित्रपटाला, नाटकाला रसिकांसमोर घेऊन जात असताना मोठी कसरत करावी लागते. मात्र दिग्दर्शकाच्या नजरेतूनच एका दर्जेदार चित्रपटाची निर्मिती होते. त्यामुळे मला अभिनयापेक्षा दिग्दर्शक म्हणून काम करायला जास्त आवडेल. अभिनयाला शेवट असतो का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, अभिनेत्याला शेवट असतो, मात्र अभिनयाला नाही. प्रत्येक गोष्टीचा एक कालावधी असतो त्यामुळे कुठून सुरूवात करायची आणि कोठे थांबायचे हे कळले पाहिजे. उत्तम अभिनयासाठी कोणते गुण असावेत? यावर बोलताना मृण्मयीने भाषेवर प्रभुत्व पाहिजे, निरीक्षणाची क्षमता आणि विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचेही सांगितले. संपूर्ण प्रकट मुलाखतीचे संचलन शोभा बोल्ली यांनी केले.---------------------कलेत राजकारण नकोकला आणि राजकारण या प्रश्नावर बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाल्या की, अनेक कलावंत हे राजकारणाशी निगडीत आहेत. कला क्षेत्रात मोठे झाल्यानंतर लाभलेल्या प्रसिद्धीमुळे अनेक कलावंत राजकारणात येतात. मात्र कलेच्या क्षेत्रात राजकारण नसले पाहिजे, जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.