शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

पैसे नाहीत म्हणून प्यावे लागते नदीचे पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 2:02 PM

सोलापूर-विजयपूर रोडवरील वडकबाळकरांची पाण्यासाठी पायपीट; शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सोय, पण लोक पितात टाकळी जलवाहिनीचे पाणी

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नदीकाठची अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया टाकळी-सोरेगाव जलवाहिनीतील प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी वापरत आहेतदुष्काळी स्थितीमुळे यंदा सीना नदी डिसेंबरपासून कोरडी आहे. पण या नदीच्या पाण्याचा उपयोग वडकबाळकरांना नाहीच

राजकुमार सारोळे

सोलापूर: सीना नदीत गेली कित्येक वर्षे महापालिकेच्या ड्रेनेजचे थेट पाणी मिसळल्याने दूषित झालेल्या नदीच्या पाण्याच्या प्रभावाने जलाशये क्षारयुक्त झाली. आता उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे नदीकाठची अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेली आहेत. विजापूर महामार्गाशेजारी वसलेल्या वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी एटीएमची सुविधा दिली तरी पैसे नाहीत म्हणून अनेक जण सोलापूरला पाणीपुरवठा करणाºया टाकळी-सोरेगाव जलवाहिनीतील प्रक्रिया न केलेले पाणी पिण्यासाठी वापरत आहेत.

दुष्काळी स्थितीमुळे यंदा सीना नदी डिसेंबरपासून कोरडी आहे. पण या नदीच्या पाण्याचा उपयोग वडकबाळकरांना नाहीच. नदीचे पाणी पिण्यालायक तर नाहीच, पण ते वापरण्यायोग्य नसते. नदीच्या पाण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरच्या ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने नदी क्षारयुक्त झाली आहे. याचा परिणाम परिसरातील जलाशयावर झाला आहे. नदीकाठापासून दोन किलोमीटर अंतरावर कोठेही बोअर किंवा विहीर खोदा तेथे क्षारयुक्त पाणी येते. त्यामुळे नदीकाठच्या नंदूर, वांगी, वडकबाळ, हत्तूरच्या पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. 

वडकबाळ ग्रामपंचायतीने नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी तांड्याजवळ विहीर खोदली आहे. या विहिरीच्या पाण्यावर ग्रामपंचायतीत फिल्टर बसविले आहे. फिल्टरला जोडलेल्या एटीएम मशीनमधून पाच रुपयाला घागरभर पाणी दिले जाते. गावची तहान या पाण्यावर भागवली जाते. तर गावात असलेल्या तीन बोअरवरून वापरण्यासाठी पाणी आणले जाते. नव्याने आणखी एक बोअर घेण्यात आला आहे. या बोअरवर पंप बसवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. 

पण तांडा, भीमनगर, वस्त्यांवरील लोकांना दररोज विकतचे पाणी घेणे शक्य नाही. असे लोक दररोज महामार्गाशेजारी नाल्यात असलेल्या सोलापूर महापालिकेच्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हवरून पाणी भरून आणतात. वास्तविक हे पाणी अशुद्ध आहे.

सोलापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टाकळी जॅकवेलमधून पंपिंग करून हे पाणी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात नेले जाते. पण या व्हॉल्व्हवरून वडकबाळ, हत्तूर, वांगी, होनमुर्गीपर्यंतचे लोक तहान भागविण्यासाठी पाणी नेत असल्याचे दिसून आले. काही नागरिकांनी हे पाणी वापरासाठी नेत असल्याची माहिती दिली. गावातील बोअरचे पाणी क्षारयुक्त आहे. त्यामुळे जनावरेसुद्धा ते पाणी पीत नाहीत. उलट हे पाणी भीमा नदीतील असल्याने जनावरे पाणी पितात. याशिवाय आंघोळ, कपडे धुण्यासाठी हे पाणी चांगले असल्याचे मत व्यक्त केले. भीमनगर येथील महिलांनी हे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. 

एटीएममध्ये दररोज पैसे देऊन पाणी आणणे परवडत नाही. त्यामुळे या जलवाहिनीवरील पाणी चांगले आहे. आम्ही हेच पाणी पिण्यासाठी वापरतो, असे सांगितले. महामार्गावरील वेगाने येणाºया वाहनांतून जीव वाचवत महिला व लहान मुले पाण्यासाठी पायपीट करताना दिसतात.

ग्रामसेविका संगीता धसाडे यांनी मात्र ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय केली आहे. लोक शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरतात तर जनावरे व इतर वापरासाठी या जलवाहिनीवरून पाणी आणतात, असे सांगितले. आम्ही आठवड्यातून एकदा जलवाहिनीवरील पाणी पिण्यालायक नसल्याची दवंडी देतो, असे सांगितले.

महापालिकेचे दुर्लक्ष- वडकबाळ व परिसरातील लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे महापालिकेच्या जलवाहिनीचे व्हॉल्व्ह लिक करून पाणी घेतले जाते. गळतीने पाणी वाया जाते. यापेक्षा महापालिकेने वडकबाळ ग्रामपंचायतीला एक इंची कनेक्शन दिल्यास पाण्याचा अपव्यय टळेल, लोकांची सोय होईल आणि उलट महापालिकेला पाणीपट्टी मिळेल. पण राजकारणामुळे याकडे दुर्लक्ष झाल्याचे एकाने सांगितले. 

पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे या व्हॉल्व्हमधून आम्ही पाणी भरतो. पिण्यासाठी व वापराच्या पाण्यासाठी हेच पाणी वापरतो. गावातील नळाला कित्येक दिवसातून पाणी नाही. उन्हाळा असो की पावसाळा पाण्याचे हाल आहेत.- मीनाक्षी शिंदे

जनावरे व घरातील वापरासाठी महापालिकेच्या जलवाहिनीवरील पाणी नेतो. इथे वडकबाळबरोबरच वांगी, हत्तूर, होनमुर्गीचे लोक पाणी नेण्यासाठी येतात. बोअरला क्षारयुक्त पाणी आहे. त्यामुळे गरिबांना दररोज विकतचे पाणी घेणे परवडत नाही. - सूर्यकांत पुजारी

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळwater transportजलवाहतूकriverनदी