उन्हाचा कडाका वाढला; सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी ४०.२° सेल्सिअस तापमानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 23:52 IST2026-03-08T23:51:34+5:302026-03-08T23:52:12+5:30

Solapur Weather: राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात या हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली असून, पारा ४०.२° सेल्सिअस (१०४.४° फॅरेनहाइट) वर पोहोचला आहे. यामुळे नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

The heat of the summer has increased; Solapur records the season's highest temperature of 40.2° Celsius | उन्हाचा कडाका वाढला; सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी ४०.२° सेल्सिअस तापमानाची नोंद

उन्हाचा कडाका वाढला; सोलापूरमध्ये हंगामातील उच्चांकी ४०.२° सेल्सिअस तापमानाची नोंद

सोलापूर -  राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. आज सोलापूर जिल्ह्यात या हंगामातील सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली असून, पारा ४०.२° सेल्सिअस (१०४.४° फॅरेनहाइट) वर पोहोचला आहे. यामुळे नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत.

आजच्या हवामान अहवालानुसार तापमानाची आकडेवारी ​कमाल तापमान: ४०.२° सेल्सिअस 
(१०४.४^\circ F) तर् ​किमान तापमान: २०.६° सेल्सिअस 
(६९.१^\circ F) याशिवाय ​हवेतील आर्द्रता (RH): २४% होती. ​हवेतील आर्द्रता केवळ २४% इतकी कमी झाल्यामुळे हवेत कोरडेपणा वाढला आहे. यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत अंगाची लाहीलाही होत असून, रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका देखील वाढला आहे.

​आरोग्य विभागाचा सतर्कतेचा इशारा
​वाढत्या तापमानाचा विचार करता आरोग्य विभागाने नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
- ​भरपूर पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. लिंबू सरबत, ताक आणि नैसर्गिक     
- पेयांचा वापर करा*.
​वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते संध्याकाळी ४ या काळात शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
- ​संरक्षणात्मक उपाय: बाहेर जाताना सुती कपडे वापरा, डोक्याला रुमाल किंवा टोपी वापरा आणि डोळ्यांच्या रक्षणासाठी सनग्लासेसचा वापर करा.
 
​या हंगामातील हे पहिलेच उच्चांकी तापमान असून, येणाऱ्या दिवसांत पारा अधिक वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी.
- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर 

Web Title : बढ़ती गर्मी: सोलापुर में मौसम का सबसे अधिक 40.2°C तापमान दर्ज

Web Summary : सोलापुर में पारा 40.2°C तक पहुंचा, जो इस मौसम का सबसे अधिक है। कम आर्द्रता के साथ, लू की स्थिति बनी हुई है, जिससे स्वास्थ्य परामर्श जारी किए गए हैं। नागरिकों से हाइड्रेटेड रहने, दोपहर की धूप से बचने और हीटस्ट्रोक से सुरक्षात्मक उपाय करने का आग्रह किया जाता है। स्वास्थ्य विभाग ने आने वाले दिनों में तापमान बढ़ने की चेतावनी दी है।

Web Title : Soaring Heat: Solapur Records Season's High of 40.2°C Temperature

Web Summary : Solapur sizzles as temperature hits a seasonal high of 40.2°C. With low humidity, heatwave conditions prevail, prompting health advisories. Citizens are urged to stay hydrated, avoid midday sun, and take protective measures against heatstroke. The health department warns of rising temperatures in the coming days.