शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतातील थंडी सोलापूरकरांना झोंबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 08:12 IST

Winter News: उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले.

मुंबई - उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. हे तापमान सरासरीच्या १४ अंश सेल्सिअसने खाली आहे. तर मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून, उन्हाचा तडाखा तुलनेने कमी झाला आहे. रात्री आणि पहाटेच्या हवेत गारवा आल्याने मुंबईला किंचित का होईना दिलासा मिळाला.

जळगावला पुन्हा रविवारपेक्षा तापमानात घसरण होऊन ९.४ अंश इतके किमान तापमान नोंदवले गेले. ते सरासरीच्या ६.४ अंशांनी खाली आहे. त्यामुळे तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. जळगावचे कमाल तापमानही २९.८ अंश नोंदवले गेले. ते सरासरीच्या ३.७ अंशने कमी झाले आहे. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अहिल्यानगर, छ.संभाजी नगर, बीड, डहाणू, नाशिक, नंदुरबार, नांदेड, सांगली या शहरांबरोबरच विदर्भातील शहरात थंडीच्या लाटेसदृश्य स्थिती  अनुभवली गेली. 

तीन दिवसांत पारा घसरेलबुधवारपर्यंतच्या तीन दिवसात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, डहाणू व  छ. संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी तसेच संपूर्ण विदर्भात किमान तापमानाचा पारा घसरणार आहे. त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : North India's cold wave hits Solapur, temperatures plummet.

Web Summary : Cold northern winds from North India brought a severe cold wave to Solapur, with Jeur recording 9°C. Jalgaon also experienced a cold wave at 9.4°C. Several other cities across Maharashtra and Vidarbha are experiencing similar cold conditions.
टॅग्स :Solapurसोलापूर