सांगोल्यात प्लास्टिकच्या पोत्यात आढळला मृतदेह; हत्यारानं वार केल्याच्या अंगावर खुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 04:14 PM2022-07-14T16:14:59+5:302022-07-14T16:15:02+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

The body was found in a plastic bag in Sangola; Marks on the body of the assailant | सांगोल्यात प्लास्टिकच्या पोत्यात आढळला मृतदेह; हत्यारानं वार केल्याच्या अंगावर खुणा

सांगोल्यात प्लास्टिकच्या पोत्यात आढळला मृतदेह; हत्यारानं वार केल्याच्या अंगावर खुणा

Next

सांगोला : अज्ञात कारणावरून अनोळखी इसमाच्या मानेवर, पाठीवर दोन्ही खांद्याच्यामध्ये, बरगडीजवळ, डोक्यात उजव्या बाजूस कोणत्यातरी धारदार हत्याराने जोरात वार करून व गुप्तांगावर मारहाण करून त्याचा कोठेतरी खून केला व त्या प्रेताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचे प्रेत हिरव्या रंगाच्या साडीमध्ये बारदानाच्या व प्लास्टिकच्या पोत्यामध्ये गुंडाळून फेकून दिले.

ही घटना बुधवार १३ जुलै रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास गुणापवाडी (ता. सांगोला) येथील नवाळवाडी जाणा-या रस्त्याच्या डाव्या बाजूस फॉरेस्ट मधील चारीत उघडकीस आली. याबाबत, पोलीस पाटील श्रीनिवास रमेश वाघमोडे ( गुणापवाडी ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला. दरम्यान पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून या खून प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांना केल्या आहेत. या खून प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.

Web Title: The body was found in a plastic bag in Sangola; Marks on the body of the assailant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.