शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

टेरी टॉवेल प्रदर्शन; भारतासह विदेशातील खरेदीदार, कंपन्यांचे प्रतिनिधी उद्या सोलापुरात

By appasaheb.patil | Updated: September 24, 2019 19:02 IST

पहिल्या आंतरराष्ट्रीय टेरी टॉवेल प्रदर्शनासस होणार प्रारंभ; चर्चासत्राचेही केले आयोजन

ठळक मुद्देफक्त सोलापुरातीलच टेरी टॉवेल उत्पादकांना या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या उत्पादनाची माहिती देता येणारजगात लागणाºया कोणत्याही प्रकारचे, दर्जाचे टॉवेल आता सोलापुरात तयार होऊ शकतेविव्हिंगच्या अनुषंगाने असो वा प्रोसेसिंग याची माहिती देणे, हा सुध्दा प्रदर्शन भरविण्यामागचा एक मुख्य हेतू

सोलापूर : ‘टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौंडेशन’च्यावतीने ग्लोबल नेटवर्कच्या सहयोगाने सोलापुरात दि. २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान ‘व्हायब्रंट टेरी टॉवेल ग्लोबल एक्स्पो व समिट २०१९’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन उद्या, बुधवार २५ सप्टेंबर २०१९ रोजी सिध्देश्वर साखर कारखान्याच्या प्रांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. 

  राज्याचे वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज प्रदर्शनाचे उदघाटन करतील. भारत सरकारचे वस्त्रोद्योग संचालक  सुशील गायकवाड,  राज्याच्या वस्त्रोद्योग आयोगाचे डॉ. माधवी खोडे-चवरे, 'एनएसआयसी'चे विभागीय सरव्यवस्थापक  संजय बोंडेकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त दीपक तावरे उपस्थित राहणार आहेत. 

    या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात  दरम्यान दुबईच्या कॉटनोपॉलिसचे प्रमुख श्री. बिपीन, मुंबईच्या सुविन अ‍ॅडव्हायझर्सचे कार्यकारी अधिकारी अविनाश मयेकर, मुंबईच्या गॉटस् सर्टिफिकेशनचे सुमित गुप्ता, दिल्लीच्या बाईग एजंटस असोसिएशनचे अपुर्वा अगरवाल, रोहिणी सुरी, अहमदाबादचे टेक्स्टाईल तज्ञ अशोक भगत, अ‍ॅमेझॉन ग्लोबल सेलिंगचे बर्जिंदर सिंग यांसारख्या आंतरराष्ट्रीय किर्तींच्या विविध मान्यवरांचे विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. 

सोलापुरात होटगी रोडवरील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या प्रांगणात भरत असलेल्या या प्रदर्शनास देश-विदेशातील असंख्य ग्राहक, खरेदीदार, पर्यटक, आयातदार-निर्यातदार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी व कापोर्रेट कंपन्या भेटी देणार आहेत. या प्रदर्शनाचा फोकस केवळ टेरी टॉवेलवर असून, फक्त सोलापुरातीलच टेरी टॉवेल उत्पादकांना या प्रदर्शनात सहभागी होऊन आपल्या उत्पादनाची माहिती देता येणार आहे व थेट विक्रीही करता येणार आहे. सोलापुरात वेगाने आधुनिकीकरण होत आहे. जगात लागणाºया कोणत्याही प्रकारचे, दर्जाचे टॉवेल आता सोलापुरात तयार होऊ शकते, मग ते विव्हिंगच्या अनुषंगाने असो वा प्रोसेसिंग याची माहिती देणे, हा सुध्दा प्रदर्शन भरविण्यामागचा एक मुख्य हेतू आहे.  

अनेक वर्षापासून विविध संकंटांचा सामना करीत कसेबसे तग धरून असलेल्या येथील यंत्रमाग उद्योगाला सध्याच्या मंदीच्या काळात या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या निमित्ताने नवा आशेचा किरण दिसत आहे. ----------तीन हजार टॉवेल्सह मानवी साखळी करणारया प्रदर्शनाच्या समारोपाच्या निमित्ताने शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता शहराच्या पूर्व भागात टॉवेलसह ३ हजार लोकांची मानवी साखळी करुन विश्वविक्रम (गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड) करण्याचा मानस आहे. जास्तीत जास्त सोलापूरकरांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फौंडेशनने केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTextile Industryवस्त्रोद्योगMarketबाजारInternationalआंतरराष्ट्रीय