चड्डी गँगची दहशत!सोलापुरमध्ये वास्तुविहारमध्ये घर फोडले; डिलिव्हरी बॉयमुळे प्रकार आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 18:11 IST2025-07-23T18:10:26+5:302025-07-23T18:11:33+5:30
मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते. त्यांनी जाताना घराच्या फाटकाला लोखंडी श्रीलला आतील दरवाजाला लावलेले तिन्ही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूमध्ये शिरले.

चड्डी गँगची दहशत!सोलापुरमध्ये वास्तुविहारमध्ये घर फोडले; डिलिव्हरी बॉयमुळे प्रकार आला समोर
सोलापूर : वसंत विहारमध्ये वावरल्यानंतर चड्डी गँगने सोमवारी पहाटे मंगल कार्यालयाजवळील वास्तू दरम्यान जुळे सोलापुरातील गिरिजा विहारमध्ये किरण रवींद्र मराठे (वय ५२) यांचे घर फोडले. ही बाब ते मंगळवारी गावाहून आल्यानंतर त्यांच्या लक्षात आली. चांदीचे काही ऐवज चोरीला गेल्याची माहिती सूत्राने दिली.
मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते. त्यांनी जाताना घराच्या फाटकाला लोखंडी श्रीलला आतील दरवाजाला लावलेले तिन्ही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूमध्ये शिरले. कपाट फोडून चांदीच्या वाटी, फूलपात्र चोरले. दरम्यान, ही घटना त्यांना मंगळवारी दुपारी कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या संदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
डिलिव्हरी बॉयमुळे उघडकीस
मराठे यांचे एक पार्सल येणार होते. ते पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घरी आला. तेव्हा त्याने मराठे यांना फोन केल्यावर मराठे यांनी पार्सल गेटमध्ये आतील बाजूस टाकण्यास सांगितले. तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने घराचे गेट आणि दरवाजा उघडे असल्याची माहिती दिली.