महापालिकेच्या ‘त्या' अधिकाºयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला आले टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 14:17 IST2020-06-01T14:13:26+5:302020-06-01T14:17:39+5:30

जिल्हा आरोग्य कार्यालयाचे केले निर्जंतुकीकरण; काही काळासाठी आरोग्य विभागाचे काम ठप्प

Tension came to Solapur Zilla Parishad due to NMC officials | महापालिकेच्या ‘त्या' अधिकाºयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला आले टेन्शन

महापालिकेच्या ‘त्या' अधिकाºयामुळे सोलापूर जिल्हा परिषदेला आले टेन्शन

ठळक मुद्देबार्शी, कुंभारी परिसरात पुन्हा रुग्ण आढळल्याने या परिसरात आरोग्य विभागाची पथके कामाला लावण्यात आली आरोग्य विभागातील सर्व कर्मचाºयांना बाहेर काढून कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे सुमारे तासभर जिल्हा आरोग्य कार्यालयातील कामकाज ठप्प

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या एका अधिकाºयाला ‘कोरोना’ची बाधा झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे. ‘त्या' अधिकाºयाने या कार्यालयात हजेरी लावल्यामुळे सोमवारी कार्यालयाचे निर्जंर्तुकीकरण करण्यात आले. 

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कार्यालयात कामानिमित्त महापालिकेचे काही अधिकारी आले होते. यातील एका अधिकाºयाला ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे समजताच खबरदारीची उपाययोजना म्हणून सोमवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाºयांना बाहेर काढून कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यामुळे सुमारे तासभर जिल्हा आरोग्य कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.

विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य कार्यालया अंतर्गत येणाºया जिल्हा कार्यक्षेत्रातील बार्शी, कुंभारी परिसरात पुन्हा रुग्ण आढळल्याने या परिसरात आरोग्य विभागाची पथके कामाला लावण्यात आली आहेत, पण अधिकारीच कार्यालयात हजर नसल्यामुळे जिल्ह्यातील स्थितीविषयी माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Tension came to Solapur Zilla Parishad due to NMC officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.