Teacher assaults student for failing to study | अभ्यास न केल्याने शिक्षिकेने पहिलीमधील विद्यार्थिनीला केली मारहाण

अभ्यास न केल्याने शिक्षिकेने पहिलीमधील विद्यार्थिनीला केली मारहाण

ठळक मुद्दे- पहिलीतील मुलीला शिकवणी शिक्षिकेने केली मारहाण- सोलापूर शहरातील अंत्रोळीनगरात घडली घटना- विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सोलापूर : पहिलीतील मुलीला मारहाण केल्याप्रकरणी खासगी शिकवणी शिक्षिकेविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंत्रोळीकर नगर येथे राहणारी पहिलीतील मुलगी ट्यूशनसाठी परिसरातील खासगी ट्यूशनमध्ये गेली होती़ यावेळी अभ्यास न केल्याच्या कारणावरून शिक्षिकेने मुलीला हाताला आणि दंडावर स्टीलच्या पट्टीने मारले़ यामुळे मुलीने रडत रडत येऊन आपल्या आईला सांगितल्यामुळे मुलीच्या आईने विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 या फिर्यादीवरून ट्यूशन शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी  अंत्रोळीकर नगर येथे घडली़ याबाबत गुरुवारी फिर्याद दिली आहे़ घटनेचा तपास पोलीस नाईक वंदना बहिरम या करत आहेत.

 

Web Title: Teacher assaults student for failing to study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.