सुपर बझार फोडून ५० हजारांची चोरी

By Admin | Updated: June 24, 2014 01:30 IST2014-06-24T01:30:40+5:302014-06-24T01:30:40+5:30

५० हजारांचा ऐवज चोरून नेला.

Super Bazaar breaks 50,000 stolen | सुपर बझार फोडून ५० हजारांची चोरी

सुपर बझार फोडून ५० हजारांची चोरी


सोलापूर: लोकमंगल सुपर बझार फोडून चोरट्याने सोन्याची नाणी, मोबाईल व रोकड असा सुमारे ५० हजारांचा ऐवज चोरून नेला.
दिनेश ईश्वर अग्रवाल (वय ४७, रा. १३२, रेल्वे लाईन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. २१ जून रोजी रात्री सुपर बझार बंद करण्यात आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीला आले. चोरट्याने पूर्वेकडील बंद लोखंडी शटर कशाने तरी उचकटून आत प्रवेश केला. आतील लोखंडी कपाट फोडून त्यात ठेवलेली सात ग्रॅमची सोन्याची तीन नाणी, एक मोबाईल हँडसेट आणि २८ हजार २४५ रुपये असा सुमारे ५0 हजाराचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
दानपेटी फोडली
रविवार पेठेतील मद्दा मंगल कार्यालयासमोरील गणपती मंदिर फोडून चोरट्याने दानपेटीतील रोकड चोरून नेली. तुकाराम कोंपेल्ली (रा. दाजीपेठ) यांच्या फिर्यादीवरून जेलरोड पोलीस ठाण्यात चोरीची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Super Bazaar breaks 50,000 stolen